शहापुरच्या डॉक्टर बडगुजर दाम्पत्याची लॉकडाऊन च्या काळात निशुल्क आरोग्य सेवा – श्री. विजय बडगुजर, नंदुरबार

||आरोग्य हे अनमोल आहे ||

यावल साखळी येथील मुळ रहिवासी असलेले डॉ. रविंद्र बडगुजर व त्यांच्या पत्नी डॉ. सौ. सरिता बडगुजर या 1992 सालापासून शहापूर या ठिकाणी रुक्मिणी नर्सिंग होम अंतर्गत आरोग्य सेवा पुरवीत आहेत. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता कोरोना या विषाणूचा कहर सर्वसामान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भेडसावत असतांंना त्यातच आपल्या भारत देशाचा आर्थिक कणा देखील डगमगला आहे. या लॅाकडाऊन च्या परिस्थितीत अनेक गोरगरीब,कामगार आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच आरोग्याची चिंता वाढली.

या लॉक डाऊन च्या काळात गरजूंना आरोग्य सेवा मिळावी म्हणून दिनांक 14 एप्रिल 2020 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रुक्मिणी नर्सिंग होम तर्फे संपूर्ण लॉक डाउन च्या काळात निशुल्क सेवा पुरविण्याचा संकल्प या बडगुजर दाम्पत्याने घेतला आहे. तरी गरजुंनी लाभ घ्यावा. तसेच इतर गरजवंतांना देखील कळवावे…..

पत्ता :

डॉ. सरिता आणि डॉ. रविंद्र बडगुजर
रूक्मिणी नर्सिंग होम
पंडित नाका, गोठेघर, शहापूर
वेळ: स. १० ते दु १ आणि सायं ४ ते ६ मो. नं. 9511753432
7276832407

2 Comments

Leave a Reply to Ravindra kotwal Bhusawal . Cancel reply

Your email address will not be published.


*