गोरगरिबांना धान्य वाटप – श्री.मोहन हिरालाल बडगुजर

भारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हा सरचिटणीस ठाणे,उद्योजक व अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती प्रमुख,समाजातील दानशूर व्यक्तींमत्व असलेले श्री.मोहन हिरालाल बडगुजर यांनी कोरोना व्हाॅयरस मुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या आदेशानुसार संचारबंदी, जमावबंदी व लॉक डाऊन जाहीर करण्यात आलेले असताना शासनाची मान्यता घेऊन हातावर पोट भरणाऱ्या कामगारांची सध्या खूप मोठी उपासमार व हालाखीचे दिवस आहेत.रोजच्या रोज काम करायचे व संध्याकाळी रोकडा पैसे मिळाल्यावर जेवण बनवायचे परंतु सर्वीकडे बंद असल्यामुळे त्यांचे खूप हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन सोमवार दि.३० मार्च रोजी सायंकाळी ५:०० वाजता डोंबिवली येथील निरुप टेक्सटाईल्सच्या कामगार मजूर लोकांना बिकट परिस्थितीत प्रत्येकी पाच किलो तांदूळ, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे व तसेच कल्याण येथील चक्कीनाका येथे देखील कंत्राटी कामगारांना सुद्धा मोठ्या प्रमाणात तांदूळाचे वाटप करण्यात आले.

        या अगोदर सुद्धा श्री.मोहन शेठ यांनी कै.मा साहेब केशरबाई हिरालाल बडगुजर यांच्या स्मरणार्थ महानगरपालिका हॉस्पिटल मध्ये रुग्णांना नेहमी फळ वाटप करत असतात त्याच प्रमाणे १४ जानेवारी २०२० रोजी शिर्डी येथील आश्रमात जावून मनोरुग्ण बालकांना धान्य व खाण्याचे पदार्थ वाटप केले आणि बडगुजर समाजातील अनेक रुग्णांना चेक द्वारे पैसे देत असतात हे सर्व समाज बांधवांना माहित आहे सामाजिक, संस्कृतीक, राजकीय, उद्योजक व कामगार क्षेत्रात त्यांनी विविध प्रकारे कामे करून समाजाचे व इतर समाज्यातील कामगार बंधूंचे मनं जिंकून समाजात मानाचा तुरा रोवला आहे याचे अनुकरण अखिल भारतीय स्तरावर व स्थानिक मंडळांनी सुध्दा बोध घेऊन समाजाला प्रगती पथावर नेण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती आहे

अखिल भारतीय बडगुजर समाज ओबीसी समिती प्रमुख.श्री.पी आर बडगुजर,
उपप्रमुख श्री.एस्.एम बडगुजर सचिव श्री. मुकेश बडगुजर, श्री. संजय बडगुजर, श्री. आर. आर. बडगुजर, श्री.आर.बी.चव्हाण आणि सर्व मान्यवर सदस्य ओबीसी समिती

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*