धुळे : येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. बापूसाहेब सुभाष पंडीत बडगुजर व सौ.कल्पना सुभाष बडगुजर यांची नात व श्री.भुषण सुभाष रघुवंशी व सौ. सपना भुषण रघुवंशी यांची सुकन्या आहे. कु. रिद्धी ही चावरा पब्लिक स्कुल मध्ये इ.३रीत शिकत आहे. अभ्यासाबरोबरच तिला खेळात पण रुची आहे. नुकत्याच SIP Abacus च्या झालेल्या परिक्षेत तिने फर्स्ट लेव्हल यशस्वीपणे पहिली लेव्हल पुर्ण केली. Abcus हा एक अंक मोजणीचा एक गणिती प्रकार आहे. याव्दारे विद्यार्थी अगदी सहजरित्या गणिताची बेरीज, वजाबाकी करू शकतात,त्याद्वारे गणित विषयात रस निर्माण होऊन विषय सोपा वाटायला लागतो.
त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कु.रिध्दीस तिच्या आई वडिलांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच कु. रिध्दीची आई सो.सपना ने सुध्दा नुकत्याच झालेल्या सेट परिक्षेत यश संपादन केले. या मायलेकींच्या यशामुळे घरात एक वेगळाच उत्साह आहे.
कु. रिध्दीस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक :
अ.भा.ब.स. युवक समिती,
बडगुजर प्राऊड ग्रुप, वेब पोर्टल टीम.


Leave a Reply