काळजी घेऊ या आरोग्याची, लढा देऊ या कोरोना विषाणूशी – डॉ. कमलेश बडगुजर, नाशिक

कोरोना विषाणू हा मनुष्य आणि प्राणी यांना प्रादुर्भाव होणार एक विषाणू परिवार आहे. या विषाणू च्या प्रादूर्भावा मुळे सर्दी खोकल्यापासून ते SARS म्हणजे अतिगंभीर स्वरुपाचा निमोनियाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. Novel कोरोना व्हायरस हा कोरोना विषाणूचा उत्क्रांती झालेला विषाणू आहे. ज्याची याआधी मनुष्याला कधीही लागण झालेली नव्हती. डिसेंबर २०१९ मध्ये वूहान प्रांतामध्ये निमोनियाचे खूप सारे रुग्ण आढळून आलेत. आणि ते Novel कोरोना या विषाणूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. याच प्रकारची साथ यापूर्वी चायना मध्ये २००३ मध्ये SARS, सौदी अरेबिया २०१२ मध्ये Middle East Respiratory Distress झाला होता. याची उत्पत्ती प्राण्यांमधून मनुष्याला झाली.

हा श्वसन मार्गाचा विकार असल्यामुळे शिंकेद्वारे (Droplate) द्वारे एका मनुष्यापासून दुसऱ्याला संसर्ग होतो. ज्यांचा प्राण्यांशी जास्त संपर्क येतो ते पशुपालक व मांस विक्रेते व रुग्णाची काळजी घेणारे डॉक्टर व नर्सेस व रुग्णाचे कुटुंबीय यांना संक्रमणाची जास्त शक्यता आहे.

लक्षणे:- साधी सर्दीपासून, ताप, खोकला, दम लागणे, जीव घाबरणे, निमोनिया, किडनी निकामी होणे व मृत्यू ओढवू शकतो. शक्यतो याचे निदान P.C.R. (Polymerase chain reaction) द्वारे होते. यासाठी परिपूर्ण उपचार उपलब्ध नाही. पण सध्या लक्षणानुसार उपचार केला जात आहे.

या आजारावर प्रतिबंधक लसीचे तसेच निदानाचे संशोधन सुरु आहे.
संसर्गापासून वाचण्याचे उपाय:-
खोकतांना नाका तोंडावर रुमाल वापरणे. मास्कचा सार्वजनिक ठिकाणी उपयोग करणे. आजारी रुग्णांचा संपर्क टाळणे. प्राण्यांच्या किंवा सार्वजनिक संपर्कानंतर किंवा रुग्णाच्या संपर्कानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे ,हस्तांदोलन टाळणे, वारंवार हात धुणे, नाकाजवळ वारंवार हात न नेणे. प्राण्यांचा संपर्क टाळणे. मांसाहार टाळणे किंवा योग्य प्रकारे शिजवूनच मांस खाणे. दूध व दुग्धजन्य पदार्थ टाळणे.
एखाद्याला आजारी रुग्णाने घरी जास्तीत जास्त आराम करणे योग्य, पण ज्यांना ताप, खोकला, जीव घाबरणे, असे लक्षण आढळल्यास तात्काळ श्वास घेण्यासाठी अत्यावश्यक कृत्रिम श्वसनयंत्र (Ventilator) सुवि धा असलेल्या रुग्णालयात त्वरित जावे.

तसेच हे चित्र सर्वांपर्यंत पोहोचवा पुण्यातील नायडू रुग्णालयात काही कोरोना चे संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे लक्षणे वरील चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे आहेत. आपण स्वतः ची तर काळजी घ्यायची आहेच. शिवाय आपले शेजारच्या लोकांना, आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळी, कामगार,घरात काम करणारे, गुरखा,बागकाम करणारे,दूधवाला, पपेरवाला इत्यादी रोजच्या जीवनात भेटणाऱ्या सर्वांना सतर्क करायचे आहे. आरोग्यम परिवारातर्फे तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना Dr Li Venliyang डॉ ली वेनलियांग ह्या चिनी डॉक्टर ने पूर्ण जगाला कोरोना सारख्या भयानक साथीची पहिली बातमी दिली आणि कोरोना बाधित सर्व रुग्णांना उपचार सुरू केले. ह्या रुग्णांची काळजी घेता घेता स्वतः डॉ ली ह्यांना कोरोना ची लागण झाली आणि दुर्दैवाने ते मृत्यमुखी पडले.

आरोग्य सेवा हिच खरी सेवा आहे. आपण सर्वांनी काळजी घ्यावी. कोरोना व्हायरस ला आपण कसे थांबवू शकतो याची काळजी घ्या.

डॉ. कमलेश बडगुजर, नाशिक

1 Comment

  1. डा.कमलेश बडगुजर साहेबांचा माहितीपुर्ण लेख.
    सर्वांनी वाचावा.

Leave a Reply to Dr d d b Cancel reply

Your email address will not be published.


*