चोपडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ,चोपडा संचलित, कै. हि.मो.करोडपती, माध्यमिक विद्यालय, चोपडा जि.जळगांव, सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार दिनांक १७-१- २०२० रोजी उत्साहात संपन्न झाला.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सोमनाथ डोभा बडगुजर (साळुंखे) हे होते तर कार्यक्रमाचे उदघाटन लोकसंघर्ष मोर्चाचे जळगांव जिल्हा सरचिटणिस श्री.संजीव शिरसाठ यांचे शुभहस्ते संपन्न झाले.संस्थेचे सचिव श्री.व्ही. एच.करोडपतीसर व मुख्याध्यापिका सौ.एस.व्ही. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदरील सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री.मंगेश भोईटे यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध लोकनृत्य, आदिवासी-कोळी नृत्य,विविध सामाजिक समस्या शिक्षण,बालविवाह, अंधश्रद्धा याविषयांवर प्रबोधनपर नाटिका,एकांकीका,समुह नृत्यांच्या मनमोहक अविष्कारांचे सादरीकरण करून उपस्थित श्रोत्यांची दाद मिळवली.

परिसरातील पालक नागरिकांचा कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन सहभागी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करुन प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिक-शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.एन.बी.बडगुजर व श्री. आर.आर. बडगुजर यांनी केले, आभारप्रदर्शन श्री.ए.पी. बडगुजर यांनी केले.सदर कार्यक्रमाला सर्वश्री. व्ही.बी.साळुंखे, पी.सी.बडगुजर, एस.टी.बोरसे, सी.पी.बडगुजर, सुनिल बडगुजर तसेच विलास सनेर यांचे सहकार्य लाभले.??
बातमी संकलनःश्री.आर.आर बडगुजर सर,चोपडा.


आतिशय सुंदर व सुरेख आयोजन-नियोजध