धरणगांव पिंप्री येथील श्री. प्रशांत अरूण कमलजा यांची सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, पी. ओ. एच. शाखेच्या युवा कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड

श्री. प्रशांत कमलजा हे पिंप्री ता. धरणगांव येथील रहिवासी श्री. अरूण भावलाल बडगुजर यांचे चिरंजीव आहेत. सध्या ते भुसावळ येथे राहतात. ते गेले १० वर्षांपासून भारतीय रेल्वेत इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वर्कशॉप मध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत युवा कार्यकारिणी च्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

     सदर वार्षिक सभा भुसावळ येथील सेंट्रल रेलवे मजदूर संघ, पि.ओ.एच शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा ११ जानेवारी २०२० रोजी सायं ६ वाजता संघसदन याठिकाणी उत्साहात पार पडली.
       या सभेचे अध्यक्षपदी मंडळ अध्यक्ष व्हि. के. समाधिया होते. तसेच विभागीय सचिव पि. एन. नारखेड़े, मंडल सचिव एस बी पाटील, समन्वयक एस के दुबे, डी एस महाजन, मिडिया सेल प्रभारी मेघराज तल्लारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
       या सभेत सचिव रिपोर्ट आणि अकाउंट सर्वसम्मतिने पास करण्यात आले. त्या नंतर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यात शाखेच्या अध्वायक्षपदी किशोर कोलते यांची निवड करण्यात आली तर युवा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी गिरीश फालक, कार्याध्यक्ष ताराचंद बहाटे, सचिव संदेश इंगले आणि उपाध्यक्ष पदी श्री. प्रशांत कमलजा यांची निवड करण्यात आली.
श्री. प्रशांत अरूण कमलजा, पिंंप्री

1 Comment

  1. !! श्री.प्रशांतशेठ यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !!
    ? व पूढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ! ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*