आयटीआय ते कंपनी मालक एक प्रेरक कथा – श्री. नितीन लालचंद बडगुजर, मुळ गांव लोहारी, ता. पाचोरा ते वाळूज एम.आय.डी.सी औरंगाबाद पर्यंतचा यशस्वी प्रवास – प्रा. मिलिंद बडगुजर सर, जळगांव

समाजातील उद्योगपतींची यशस्वी गाथा

लोहारी तालुका पाचोरा येथे अत्यंत हालाखीच्या गरीब परिस्थिती नितीन चा जन्म झाला. घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना त्यात आपल्या जीवनाचा चरीत्रार्थ चालवण्यासाठी धडपड करणाऱ्या श्नी .लालचंद बाबूलाल बडगुजर. व सौ. मीना लालचंद बडगुजर यांच्या संसारातील ही पहिले फूल .दोघांचेही शिक्षण जेमतेम सही करण्यापुरता झालेले. त्यातसंसाराचा गाडा चालविण्यासाठी शेती हाच एकमेव उद्योग. अशाही परिस्थितीत आपल्या मुलांनी शिकले पाहिजे म्हणून त्यांची सतत धडपड सुरू होती .मातीच्या घरात जेवायला बसल्यानंतर कधी धाब्यातून माती पडेल सांगता येत नव्हतं. त्यामुळे आपल्या नवऱ्यासोबत शेतात काम करता करता मीना बाईने पशुपालन व दुग्ध विक्री सुरू केली .त्यातून येणारा चार आठ आण्याच्या तुटपुंज्या रकमेतून संसाराचा गाडा हाकत दोघांनी नितीनला लहानाचे मोठे केले.

आई-वडिलांना शेतीच्या कामांमध्ये मदत करत करत इयत्ता नववीपर्यंत शिक्षण लोहारी या खेडेगावातच पूर्ण झाले .त्यानंतर येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेचा म्हणजे दहावीच्या परीक्षेचा प्रश्न उभा राहिला .पण म्हणतात ना “प्रामाणिकपणा आणि कष्टाला सर्वांची जोड असते” यासाठी नितीन चे मामा श्री गोपाल लोटन पाटील भोकरकर यांनी त्याची इयत्ता दहावीची जबाबदारी स्वीकारली .आपल्या भाच्याला आपल्या मुलांसोबत दहावीची परीक्षा देणे अवघड जाणार नाही याची खात्री त्यांना होती. म्हणून त्यांनी नितीनला दहावीसाठी भोकर विद्यालयात प्रवेश घेतला. आई-वडिलांचे आशीर्वाद मामांचे सहकार्य आणि स्वकष्टांच्या जिद्दीवर 65 टक्के गुण मिळवत गणितात शाळेत दुसरा येण्याचा बहुमान त्याला मिळाला.

दहावी नंतर काय करावे हा प्रश्न सर्वसामान्य मुलांप्रमाणे नितीनला सुद्धा पडला पण “”प्रामाणिकपणे कष्ट करण्याची जिद्द असली तर परमेश्वर सुद्धा साथ देतो”” या युक्तीचा अनुभव त्याला आला. दहावीनंतर अकरावी बारावी करण्यापेक्षा नितीने आयटीआय करावे असा उपदेश मामा श्री प्रदीप लोटन चव्हाण यांनी केला. म्हणून गव्हर्मेंट आयटीआय मध्ये टर्नर ट्रेड साठी त्याने फॉर्म भरला. पहिली आणि दुसरी यादीत नंबर न लागल्याने हताश व निराश झालेल्या नितीनला तिसऱ्या यादीने मात्र दिलासा मिळाला. हळूहळू आयटीआयचे शिक्षण पूर्ण झाले अकरावी बारावी चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठे साडू( हे नाते नंतर जमले ) श्री प्राध्यापक मिलिंद चिंधु बडगुजर यांनी त्यांच्या विद्यालयात प्रवेश घेतला. बारावी आयटीआय पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथील स्विफ्ट कंपनी अप्रेंटीशीप पूर्ण केली.

नितीन म्हणतो,” आयटीआय मध्ये डिस्टिंक्शन म्हणजे 76% गुण मिळवल्यामुळे माझी दोन महिन्याच्या टुलिंग सीएनसी प्रोग्रम्मिंग या कोर्ससाठी निवड झाली. यामुळेच मी टुलींग क्षेत्राकडे वळलो .स्वतःच्या शिक्षणाचा व अनुभवाचा उपयोग आपला चरितार्थ व आई-वडिलांना मदत करण्यासाठी व्हावा म्हणून मी इतर मित्रांसोबत औरंगाबाद गाठले. ज्योतिर्लिंग इंडस्ट्री मध्ये सर्वप्रथम सीएनसी प्रोग्रमिंग मध्ये अत्यंत तुटपुंज्या म्हणजे 3600 रुपये महिने पगारावर मी कामाला लागलो .””मिळेल ते काम करण्याचा नेहमी प्रयत्न “”असल्यामुळे आणि आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे हीच जिद्द मनात पहिल्यापासून होती .माझा प्रामाणिकपणा व कष्ट पाहून याच कंपनीमध्ये मला कॉलिटी इन्स्पेक्टर म्हणून बढती देण्यात आली. वर्ष होते 2009 चे .पगार होता दहा हजार रुपये .त्यात स्वतः काय खावे आणि घरी काय द्यावे. हा यक्ष प्रश्न होता.”” पण इच्छा असेल तर मार्ग दिसेल “” या.उक्तीप्रमाणे एकट्याच्या पगारात कसे भागवावे यातूनच मनाच्या एक खोल कप्प्यात ,आजच्या मोठ्या उद्योजकाची ठिणगी पडली. आपण स्वतःची कंपनी का स्थापन करू नये ? हा विचार सुरू झाला “”

“”खरंतर हा काळ होता कंपनीतील संघटित कामगारांच्या संपाचा माझ्या मनातील हा विचार मी माझ्या कंपनीत कामात असलेल्या जितेंद्र मराठी व राजू गाडेकर या मित्रांना बोलून दाखवला. आम्ही तिघे संघटित कामगार नसल्यामुळे आम्हाला मार्केटिंग प्रोडक्शन आणि प्रोग्रॅम अशी सर्व कामे करावी लागत होती. कंपनीत येणाऱ्या ऑर्डर घेणे , माल तयार करणे ,.आणि मार्केटमध्ये तो माल विकणे. अशा तीनही प्रकारचा अनुभव सोबत असताना ,आपण सर्व काम काम करत असताना स्वतःची कंपनी का टाकू नये हा विचार बळावला. परंतु घरची परिस्थिती अत्यंत साधारण ” काम करेल तर खाईल ” याची जाणीव आम्हाला होती. याही परिस्थितीत आम्ही ओव्हरटाईम करून तीन महिन्यानंतर तिघांनी एक लाख रुपये जमा करून ओम साई इंडस्ट्रीज कंपनीची मुहूर्तमेढ रोवली .बाजारातून सेकंड लेथ मशीन विकत घेऊन वाळूज एमआयडीसी मध्ये पाच हजार रुपये महिन्याच्या गाळ्यात ही कंपनी सुरू झाली .नोकरीच्या ठिकाणी काम करून उरलेल्या वेळात स्वतःच्या कंपनीमध्ये काम करून जेमतेम जम बसविण्याचा आमचा हा पहिलाच प्रयत्न. आमचे कौशल्य आणि काम बघून पहिल्याच महिन्यात रुमा टेक्नॉलॉजी या कंपनीने आम्हाला डाय बनवण्याची ऑफर केली. मिळालेले मोठे आव्हान आम्ही तिघांनी कामाच्या वेळा बदलून दिवसभर मशीन चालू राहिल. काम पूर्ण होईल याकडे लक्ष दिले .महिन्यानंतर एक लाख रुपये हातात आले. मात्र मोठ्या प्रमाणावर धावपळ झाली “”

“”शेवटी मोठा”” निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपली. खरंतर कंपनी स्थापन झाल्यापासून आम्ही घरी कोणाला सांगितले नव्हते .कारण याची पुसटशी कल्पना जरी कुणाला दिली असती. तरी इतरांप्रमाणे आम्हाला सुद्धा, “”नोकरी मिळत नाही आणि चालले मोठे कंपनी मालक व्हायला. डोके ठिकाणावर आहे काय ?”” हाच उपदेश मिळाल्याशिवाय राहिला नसता. म्हणून कुणाला न सांगता ज्योतिर्लिंग इंडस्ट्रीचा राजीनामा देऊन मी स्वतः क्वलिटी इंस्पेक्टर जितेंद्र मराठे एका पेपर मिल मध्ये काम करणाऱ्या मजुराचा मुलगा त्याला मार्केटिंगचा अनुभव होता .तर राजू गाडेकर एका शेतकऱ्याचा मुलगा त्याला मशीन शॉप सुपरवायझर म्हणून अनुभव होता. कंपनी स्थापन करण्यासाठी या तीनही गोष्टींची म्हणजे “ऑर्डर उत्पादन आणि मार्केटिंग “याच कौशल्यांची गरज असते. “ओम साई इंडस्ट्री” कंपनीचे नाव ठरले पण मोठ्या कंपनीची ऑर्डर मिळवण्यासाठी व्हँट नंबर असणे आवश्‍यक असते .त्यासाठी कंपनीची स्वतःची जागा असणे महत्त्वाचे. या काळात एमआयडीसी मध्ये जागा मिळवणे म्हणजे खिशात लाख रुपये तरी पाहिजे होते आणि आम्ही तर आता कुठे पाय रोवला होता.पण” नो पेन नो गेन” “स्वतःच्या अनुभवातून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी जो करतो तो नेहमी यशस्वी होतो”” याची जाणीव आम्हाला होती.

श्री. नितीन लालचंद बडगुजर सहपरिवार फोटो

“आव्हाने पेलण्याची सवय आम्हाला झाली होती. जागेचा प्रश्न मिटवण्यासाठी भाड्याने घेतलेल्या दुकानाच्या जागा मालकालाच चौथा पार्टनर करून घेण्याचे आम्ही ठरवले मशीन कामगार आम्ही स्वतः होतो. महिन्याचा पगार बाजूला काढून उरलेला नफा वाटून घेत आम्ही तिन्ही कामगार असलेल्या कंपनी ची उलढाल आता लाखो जाऊन पोहोचली. 2017 नंतर जितेंद्र मराठे आणि राजू कोळेकर यांनी मोठा निर्णय घेतला. स्वतःच्या कौशल्यांना अधिक वाव मिळावा म्हणून त्यांनी नवीन कंपनी स्थापन करण्याचे ठरविले .मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आम्ही उरलेल्या दोघांनी दहा लाख रुपये देऊन ओम साई इंडस्ट्रीज ही कंपनी विकत घेतली. मी आणि जागा मालक असे दोघं पाटनर मिळून “”ओम साई टुलिंग”” या नवीन नावाने आज ही कंपनी चालवीत आहे त्यात मी स्वतः इतर चार कामगारांसोबत काम करत आहे. भाड्याच्या घरामध्ये मी आणि पत्नी सौ सपना यांनी सुरू केलेल्या संसारवेलीवर आज कु.आरुषी नावाचं चार वर्षाचा फुल उमललेले आहे .माझा लहान भाऊ सचिन लालचंद बडगुजर आणि श्रद्धा सचिन बडगुजर यांच्या मदतीने आज स्वतःच्या घरात शिफ्ट झालो आहे.”

” आजच्या तरुणांना एकच संदेश देईल धाडस करा “हिम्मत है मर्दा तो मदत करेगा खुदा” धाडस करा अन्यथा तुम्ही सुद्धा इतरजणांमध्ये सामील होऊन जाणार.. उद्योजक बनण्यासाठी आवश्यकता असते केवळ धाडसाची. मी जर आज धाडस केले नसते तर कदाचीत इतर आयटीआय झालेल्या मुलांप्रमाणे शेतात ,एखाद्या गॅरेज वरती, किंवा इतर मालकाच्या हाताखाली एखाद्या कंपनीत कामगार म्हणून काम करत राहिलो असतो. मला सांगायला अभिमान वाटतो या कंपनीची उलाढाल महिन्याला तीन लाखापर्यंत पोहोचली असून येणाऱ्या भावी काळात आपल्या सदिच्छा व वडीलधाऱ्यांचा आशीर्वादाने मोठ्या जागेवर स्थलांतरित करण्याचा मानस आहे . परमेश्वर त्यात नक्कीच यश देईल.”

युवा उद्योजक श्री. नितीन लालचंद बडगुजर

“मी तयार आहे अजून एक नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी तुम्ही आहात का ? “”

शब्दांकनः प्राध्यापक श्नी.मिलिंद चिंधु बडगुजर. ( 9421184495 )

7 Comments

  1. अभिनंदन,आपल्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,

    नवीन पिढीने नोकरी मागे न पळता आपले अनुकरण करावे

Leave a Reply

Your email address will not be published.


*