बडगुजर समाजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
कु.सायली बडगुजर हिची राज्य आट्यापाट्या स्पर्धेमध्ये निवड होऊन राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी एन्नाकुलम येथे दिनांक 10 जानेवारी ते 13 जानेवारी या दरम्यान होणार्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सहभाग हा बडगुजर समाजासाठी अत्यंत मानाचा मुद्दा आहे कारण महाराष्ट्रात बडगुजर समाज हा अत्यंत अत्यल्प असून त्यातून महाराष्ट्रात निवडलेल्या बारा मुलींमधून अमळनेर येथील श्नी.किरण शांताराम बडगुजर व सौ सुवर्णा बडगुजर यांची मुलगी कन्या ( मुळगाव मांडळ ) हिची निवड होणे समाजासाठी एक विशेष बाब आहे.

असे म्हटले जाते की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तद्वतच कु. सायली ला लहानपणापासून खेळाची फार आवड असल्यामुळे आतापर्यंत अनेक खेळांमध्ये तालुका जिल्हा तसेच विभाग व राज्य पातळीवर सहभाग घेतला आहे. कु. सायली ही इयत्ता बारावी सायन्स मध्ये प्रताप कॉलेज अमळनेर येथे शिकत आहे. श्री किरण शांताराम बडगुजर हे आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडळ येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. श्रीमती चंद्रकला व कै. शांताराम उत्तम बडगुजर माजी चेअरमन आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडळ यांची नात आहे.

जिल्हास्तरावरील खो-खो, आट्यापाट्या, क्रिकेट ,जुदो, मैदानी खेळांमध्ये बांबु उडी, 400 मीटर रनिंग, स्पर्धा रिले रेस, हॉलीबॉल स्पर्धा, टेक्निक क्वाइंड. अशाप्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेली आहे.
महाराष्ट्र राज्यातील विविध विभागीय स्पर्धांमध्ये खो-खो, आट्यापाट्या, क्रिकेट, मैदानी बांबू उडी ,हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये ती विजयी झालेली आहे तीला अनेक प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात आले आहे.
आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया या मार्फत दिनांक 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर या काळात घेतल्या गेलेल्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा ती महाराष्ट्र राज्याकडून खेळूली त्यात तिने तिसरा क्रमांक पटकावला होता .यासाठी तिला जळगाव जिल्हा आट्यापाट्या प्रशिक्षक श्री माकडे सर व श्री के पी बडगुजर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

जळगाव जिल्ह्यांमधून निवड झालेल्या तीन खेळाडूंपैकी बडगुजर समाजातून प्रथमच कु. सायली चे 31 व्या सीनियर वुमन नॅशनल आट्यापाट्या चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत आहे या स्पर्धेमध्ये तिने अव्वल कामगिरी करून दाखविल्यास तिची निवड भारताच्या राष्ट्रीय आट्यापाट्या स्ंघामध्ये केली जाणार आहे .तिला या स्पर्धेमध्ये यश मिळावे यासाठी अखिल भारतीय बडगुजर महासमिती ,सरस्वती मिशन तसेच बडगुजर प्राऊड ग्रुपच्यावतीने हार्दिक शुभेच्छा
शब्दांकन . प्रा.मिलिंद बडगुजर ( 9421184495 )


Congratulations sayali 🎉💐
Thank you very much