डॉ. दिपक (साई) पाटील यांचा ६३वा वाढदिवस प्रेरणादायी असा आदिवासी विद्यार्थिंनींना स्वेटर – अल्पोपहार व रुग्णांना मिठाई वाटप करून साजरा – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

चोपडाः येथिल नृसिंह हाॕस्पीटलचे सर्वेसर्वा प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डाॕ.दिपक ओंकार पाटील(डाॕ.साई)यांचा ६३वा वाढदिवस मान्यवर, आदिवासी विद्यार्थिनी व रुग्णांचे उपस्थितीत साध्या पण उत्साही वातावरणांत साजरा करणेत आला. सदर प्रसंगी चोपडा येथिल सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह- कै.हिरालाल मो. करोडपती माध्यमिक विद्यालयाच्या आदिवासी विद्यार्थिनींना स्वेटर व अल्पोपहार वाटण्यात आला तसेंच नृसिंह हाॕस्पीटलच्या रुग्णांना मिठाई वाटणेत आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चोपड्याचे प्रसिध्द वयोवृध्द डाॕ.सुरेश जी.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पूज्य सानेगुरुजी प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब विठ्ठल ओंकार पाटील होते. सदरप्रसंगी संस्था सचीव श्री.व्ही.एच्.करोडपती सर, प्रा.विनायक पाटील, डाॕ. दिलीप पाटील, श्री.विश्वजीत पाटील,श्री.पंकज करोडपती, डॉ.पराग पाटील, पाटील कुटूंबिय परीवार, श्री.आर.आर. बडगुजर सर, श्री.काशीनाथ बडगुजर सर (धानोरा), आदिवासी विद्यार्थिनी, नृसिंह हाॕस्पीटलचे रुग्ण व स्टाॕफ, गुरुजन व शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. साईंचे अभिष्ठचिंतन करून भरभरून शुभेच्छा दिल्या.

डॉ. दिपक (साई) यांना अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर्स प्राऊड गृप व समस्त वेब पोर्टल टीम तर्फे ६३ व्या वाढदिवसाच्या व चोपडा परिसरातील बडगुजर समाज व समाजेतर रुग्णाच्या सेवेकरितां दिर्घायुष्याच्या कोटीकोटी शुभेच्च्छाl???

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*