नंदुरबार नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी श्री दिलीप भाऊ बडगुजर यांची बिनविरोध निवड!!

बडगुजर समाजात आनंदी आनंद!


नंदुरबार नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी
श्री दिलीप भाऊ बडगुजर यांची बिनविरोध निवड!!

नंदुरबार – समाजाची निष्ठेने व
प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचे
फळ लाभत कुठलीही राजकीय
पार्श्वभूमी नसतांनाही
श्री दिलीपभाऊ बडगुजर यांना
नंदुरबार नगरपालिकेत स्वीकृत
नगरसेवक म्हणून सन्मानीत
केले गेले आहे. या बडगुजर
जननायकाच्या रूपाने
समाजालाही बहुमान
दिला गेला आहे!

आपल्या बडगुजर समाजासाठी
तळमळीने झटण्याची वृत्ती
पाहून शिवसेना नेते माननीय आमदार
श्री चंद्रकांत रघुवंशी साहेब
यांनी त्यांची नगरपरिषदेच्या
स्वीकृत नगरसेवकपदी
निवड केली आहे.

श्री दिलीप भाऊंचा नगरसेवक
म्हणून सन्मान म्हणजे
नंदुरबार बडगुजर
समाजासाठीच नव्हे तर
अखिल भारतीय बडगुजर
समाजासाठी अभिमानाची
बाब आहे.

श्री दिलीप भाऊ हे अनेक
वर्षांपासून अहोरात्र समाजसेवा
करीत आहेत. समाजसेवा हे
त्यांचे व्रतच आहे.

सन 2000 मध्ये नंदुरबार
येथील बडगुजर समाजातील
काही तरुण मंडळी एकत्र आली.
त्यांनी नंदुरबार मंडळाची
स्थापना करायचे ठरवले.
तेव्हापासून
श्री दिलीप भाऊ यांनी
नंदुरबार बडगुजर समाज उन्नती
मंडळाचे नाव हे संपूर्ण बडगुजर
समाजात प्रसिद्ध केले.
तेव्हापासून श्री दिलीप भाऊ यांनी
कधीही मागे वळून पाहिले नाही.

त्यांच्या समाजसेवेचाआलेख
नेहमी चढताच राहिला आहे.

श्री दिलीप भाऊ यांचा
सन 2002 ते 2017 कार्यकाळ
अध्यक्षपदावर राहिला.तसेच
अखिल भारतीय बडगुजर समाज
युवक समितीच्या प्रमुखपदीही
ते विराजमान आहेत.

श्री दिलीप भाऊ यांच्या या
यशाबद्दल नंदुरबार बडगुजर
समाज उन्नती मंडळ
नंदुरबार येथील सर्व
समाज बांधव, अखिल भारतीय
बडगुजर समाज युवक
समिती व बडगुजर
प्राउड ग्रुप यांच्यातर्फे
हार्दिक हार्दिक अभिनंदन!

देवी चामुंडा त्यांच्या कार्याला
यश देवो.समाजकार्याचा
आलेख नेहमी चढताच राहो!
या प्रार्थना आहेत!

2 Comments

  1. मनःपूर्वक अभिनंदन. . ! ? दादा
    नंदुरबार जिल्हा बडगुजर समाजाच्या इतिहासात नोंद घेण्याचा सुवर्ण वेळ. आपण सदैव अश्याच यशाच्या पायर्या चढाव्यात ही भगवंत चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा भरभरुन शुभेच्छा. . ! ?
    Njoy. . ! ?

  2. ? !! श्री.दिलीपशेठ यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !! ?
    नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या हातून समाजाचे कल्याणकारी कार्य होत राहो
    व त्यातूनच यापुढे आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदीच्छा !

Leave a Reply to रामकृष्ण पी. बडगुजर, दोंडाईचा (धुळे) Cancel reply

Your email address will not be published.


*