लकी बडगुजर यांची प्रमुख भुमिका असलेला बहुचर्चित हॉरर चित्रपट “रहस्य” याचे नुकतेच पोस्टर रिलीज – चित्रपट ७ फेब्रुवारी ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला – श्री. मनिष बडगुजर, पुणे

प्रत्येक नवी रात्र ही रहस्याला जन्म देत असते. अशाच एका रहस्याचा आणि त्या रहस्याचा शोध घेण्याच्या प्रवासाचा थरारक अनुभव देणारा ‘भावेश प्रोडक्शन्सचा’ ‘रहस्य’ हा आगामी मराठी चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा शानदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते पुणे येथे संपन्न झाला.

नव्या पिढीचे नवीन आशय असलेले चित्रपट मोठ्या प्रमाणात येत असून मराठी चित्रपटासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे असं सांगत मेघराज राजेभोसले यांनी ‘रहस्य’ चित्रपटाला व चित्रपटाच्या संपूर्ण टीमला यावेळी शुभेच्छा दिल्या.

भव्यदिव्य स्वरूपात चित्रपट सादर करून पडद्यावर लोकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी ‘रहस्य’ या चित्रपटातून केला असून आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास
दिग्दर्शक भावेश पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

मराठी चित्रपटात अलीकडे प्रेक्षकांना नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो. या प्रयत्नातूनच अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटात घडताना दिसतात. भावेश पाटील दिग्दर्शित ‘रहस्य’ या चित्रपटातही व्हीएफक्स तंत्रज्ञानाचा मराठीत आजपर्यंत कधीही न दिसलेला सर्वाधिक वापर दिसणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे नव्या दमाच्या कलाकारांनी हा चित्रपट साकारला आहे.

घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं दडलेलं ‘रहस्य’ हा या चित्रपटाचा गाभा आहे. चित्रपटात प्रमुख भुमिकेत लकी बडगुजर हे आहेत आणि त्यांच्या सोबत सहकलाकार राकेश बागुल, स्वाती पाटील, ऋतुजा सोनार, स्वाती शुक्ला आदी. कलाकारांच्या यात भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा भावेश पाटील यांची आहे.

लकी बडगुजर यांचा हा पहिला चित्रपट आहे. आपल्या समाजातील नविन स्टार उदय हा रहस्य चित्रपट मार्फत होणार आहे. सर्व समाज बांधवांनी हा चित्रपट एकदा तरी पहावा, यात जबरदस्त इंटरटेनमेंट, हॉरर दृश्ये आहेत. आणि सहपरिवार पाहण्यायोग्य चित्रपट आहे.

रहस्य चित्रपटाचे पोस्टर रिलीज करतांना सर्व कलाकार आणि दिग्दर्शक

लकी बडगुजर यास मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पणासाठी आणि हा चित्रपट सुपरडुपर हिट होवो यासाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा…

शुभेच्छूक :
समस्त वेब पोर्टल टिम

4 Comments

Leave a Reply to Dr.Aba Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*