सुरत येथील श्री. सुधाकर नारायण बडगुजर यांची भारतीय पोस्टल डिपार्टमेंट मधून सेवानिवृत्ती – श्री. विजय जगन्नाथ मांडेवाल, बोईसर

सुरत येथील रहिवासी श्री. सुधाकर नारायण बडगुजर हे नुकतेच भारतीय पोस्टल डिपार्टमेंट मधून सेवानिवृत्त झालेत. ते मुळचे पिंपरखेड ता. भडगांव येथील आहेत. त्यांचे वडील कै. नारायण मांगो बडगुजर हे एक कुशल शिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाने तसेच आपले शैक्षणिक कौशल्य दाखवित स्वबळावर भारतीय पोस्ट विभागात नोकरी मिळविली. ते १९८३ साली नोकरीस रूजू झालेत. त्यांचा विवाह हा पिळोदे, ता. अमळनेर येथील कै. जगन्नाथ अमृत मांडेवाल यांची मुलगी सौ. कल्पना यांचेशी झाला.

पोस्टल विभागात नोकरी करत असतांना त्यांनी आपली एक वेगळीच ओळख तयार केली होती. अत्यंत प्रामाणिक आणि प्रेमळ स्वभावामुळे सर्वांचे ते लाडके सहकारी होते. त्यांना मिळालेली जबाबदारी त्यांनी आपल्या कारकिर्दीत अतिशय यशस्वीरीत्या पार पाडली. आणि ती कौतुकास्पद होती.

त्यांनी दि. ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्ती घेतली. सेवानिवृत्ती घेतांना त्यांचा डिपार्टमेंट कडून भव्य सत्कार करण्यात आला. आणि सर्व सहकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. त्यांना गेल्या वर्षीच दोन जुळे मुले चि. हेत आणि कु. हेत्वी झालेत. अत्यंत सुखी असा परिवार आहे. त्यांना सर्व नातेवाईक आप्तेष्ट आणि मित्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छूक :
गं. भा. कुसुम जगन्नाथ मांडेवाल, पिळोदे,
श्री. संजय जनार्दन बडगुजर, बोदवड,
संजय जगन्नाथ मांडेवाल, किनगांव,
विजय जगन्नाथ मांडेवाल, भोईसर,

आणि समस्त वेब पोर्टल टिम.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*