चोपडाः येथील कु.प्रियंका चव्हाण,श्री. मोहनराव गुलाबराव चव्हाण(बडगुजर)न्यायाधीश,यांच्या कन्येने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या न्यायाधीश पदाच्या स्पर्धा परिक्षेत ३००पैकी १४८गुण मिळवून यश संपादन केलेने त्यांची दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी पदावर अभिनंदनीय निवड करण्यात आली.
कु. प्रियंका चव्हाण ह्या मूळ चोपडा येथील रहिवासी कै. गुलाबराव रामदास शेठ चव्हाण बडगुजर यांची तसेच कै. गिरधर रामकृष्ण बडगुजर कढोली जळगांव यांची नात आहे.
कुमारी प्रियंका हिने विधी शाखेची पदवी एस्. एम्. मणियार लॉ कॉलेज जळगांव येथून घेतली आहे. बारावीनंतर पाच वर्षांची विधी शाखेची पदवी घेऊन प्रथम प्रयत्नातच न्यायाधीश होण्याचा मान कु. प्रियंका हिने प्राप्त केला. कु. प्रियंका ह्या सौ. संगिता मोहनराव चव्हाण व श्री. मोहनराव गुलाबराव चव्हाण यांची मुलगी आहे.
कु. प्रियंका हिची न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल चोपडा येथील बडगुजर समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून कु.प्रियंका तसेच मातापित्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर्स प्राऊड तथा एक समाज एक व्यासपीठ प्रेरीत वेब पोर्टल टीम तर्फे चव्हाण परीवाराचे हार्दिक अभिनंदन व कु.प्रियंका चव्हाण हीस भरीव कामगिरीस व बडगुजर समाजाचे नांव लौकिकात भर टाकणेस्तव कोटीकोटी शुभेच्छाl
???????
प्रियंका हिचे चुलत मामा श्री. संजय जगन्नाथ बडगुजर यांचे कडून विशेष आभार. आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
बडगुजर पाऊल पडती पुढे ??♀


“मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन” व
पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा !
कु.प्रियंकाच्या या घवघवीत यशामुळे समाजाच्या
नावलौकिकात भर पडली ! खुप छान ! अभिनंदन !
खूपच छान, बडगुजर समाजाचे नाव लौकिक केले,कमी वयात अलौकिक कामगिरी, प्रियंका we proud of you all badgujars, hurty congretulation”priyanka” तुझ्या पुढील वाटचालिस अनंत शुभेच्छा
खूपच छान, बडगुजर समाजाचे नाव लौकिक केले,कमी वयात अलौकिक कामगिरी, प्रियंका we proud of you all badgujars, hurty congretulation”priyanka” तुझ्या पुढील वाटचालिस अनंत शुभेच्छा.again wish you all the best
प्रियंका आपल्या यशा बरोबर समाजाचे नाव पुढे आले आपले अभिनंदन