कर्जत येथील श्री. दिपक बडगुजर यांना ‘कॅण्डीड व पोर्ट्रेट फोटोग्राफी’ स्पर्धेत प्रथम पारितोषिक – श्री. अविनाश बडगुजर, नवी मुंबई

रायगड जिल्हयातील ‘फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन’च्या वतीने दिनांक 13.12.2019 रोजी पाली येथे जिल्हातील एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या मध्ये जिल्हयातील फोटोग्राफरना प्रोत्साहन मिळण्यासाठी ‘कॅण्डीड व पोर्ट्रेट फोटोग्राफी’ वर एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

श्री. दिपक बुधाजीराव बडगुजर हे कर्जत येथील समाजबांधव प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध आहेत.   

वरील स्पर्धेमध्ये  कर्जत येथील श्री. दिपक यांच्या दोन्ही कॅण्डीड फोटोला प्रथम पारितोषिक व पोर्ट्रेट फोटोला द्वितीय पारितोषिक मिळाले. सादर कार्यक्रमात महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच रायगड फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

पारितोषिक स्विकारताना श्री. दिपक बडगुजर

मुंबईतील प्रसिद्ध फोटोग्राफर श्री. पराग शिंदे सर व रायगड मधील प्रसिद्ध फोटोग्राफर श्री. सुधीर नाझरे सर यांनी सदर फोटोंचे परीक्षण केले.

1 Comment

  1. ? !! मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !! ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*