? दुग्ध प्राणी प्रजनन व दुग्धव्यवसाय विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम

⚡ दूध उत्पादन वाढीकरीता पायाभूत सुविधा निर्माण करणे व त्याचे बळकटीकरण करण्यासाठी सहकारी दूध संघाच्या माध्यमातून सदर योजना राबविली जाते.

? योजनेच्या प्रमुख अटी : केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यस्तरीय दुग्धप्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ यांना घेाषित केले असून त्यांच्याकडे सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

? आवश्यक कागदपत्रे : सविस्तर प्रकल्प अहवाल? लाभाचे स्वरूप असे : 50 टक्के केंद्र शासन व 50 टक्के खर्चाचा हिस्सा लाभार्थीस करावा लागतो.

? या ठिकाणी संपर्क साधावा : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, गोरेगाव (पूर्व), मुंबई 400065.? (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*