कुटुंब संस्था टिकवण्यासाठी समजूतदारपणा हवा… श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर, महिला संघटक, अ. भा. ब. स. महासमिती, बोराडी

मोठ्या एकत्र कुटुंबाची गोष्ट सोडली तरी आई वडील व भाऊ बहिणीसारख्या छोट्या आदर्श कुटुंबातही आज विस्कळीतपणाची स्थिती आहे. मुलाचे लग्न होताच त्याला आई वडील व बहीण घरातील कस्पटासारखी वाटू लागतात. त्याला त्याच्या पत्नी पुरते व पत्नीला त्याच्यापुरते जग दिसू लागते. पती जगातील सर्व सुखे पत्नीच्या पायाशी घालू इच्छीत असतो. तर पत्नी पतीला त्याच्या आई वडील, बहीणीकडून हिरावून स्वतः पुरता राखू इच्छित असते. ती सासू-सासरे व नंदणेदबद्दल तक्रार करून पतीचे कान भरते. पती पत्नीच्या डोळ्यातून अश्रू पाहून तिला सारेजण छळत असतात असा समज करून घेतो. त्यामुळे तो वेगळे होण्याचा निर्णय घेतो.

 त्याच्या या निर्णयाने घरात भूकंप होतो. तुला शिकवून सनरूम एपढ्यासाठीच मोठा केला का? असे विचारतात. यावर मुलगा यामध्ये विशेष काय

केले? असे सारेच आई वडील करीत असतात. असे बोलून त्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयल करतो. अशावेळी आई वडील व इतर सदस्य सहनशील असतील तर विषाचे घोट पीत त्यांच्या सोबत राहतात. पण जर तेही अहंकारी, स्वाभिमानी असतील तर कुटुंब विस्कटणे निश्चित होते. बोलण्या बोलण्याने शब्द वाढतात व गोष्ट हाणामारीवर येते.

 आजच्या तरूणांमधील हा आंधळा स्वार्थ त्यांना कोठे नेईल याचा ते विचारच करीत नाहीत. पती-पत्नी एकमेकांवर प्रेम करतात यात वाईट काहीच नाही. परंतु जेव्हा प्रेम आपले होते तेव्हा ती नक्कीच

वाईट गोष्ट आहे. खरे तर प्रेम करणाऱ्यांचे मन आकाशासारखे विशाल व पृथ्वीसारखे सहनशील असायला हवे.

 ज्या ज्या वेळी पुरुष भरकटत असतो. त्या त्या वेळी स्त्रीच त्याला योग्यस मार्गावर आणते असे इतिहास सांगतो. परंतु जेव्हा स्त्रीच पुरुषाच्या मदांधतेत व स्वार्थाधतेत डुबू लागते तेव्हा विनाशाशिवाय दुसरे काहीच होत नसते.

 आज ज्यांना आपले घर कुटुंब देश समाजाशी कसलेही देणे घेणे नसणारी पिढी तयार होत आहे. परंतु जर स्त्रीने, घरातील सुनेने थोडासा समजूतदारपणा दाखवला तर फक्त कुटुंबच सुखी-

समृद्ध होणार नाही तर देशाला, समाजाला ती एक उत्तम योग्य वारसदार देऊ शकेल.

संसार आपोआप यशस्वी होत नसतो :

सामान्यत: लयापूर्वी सर्व मुलींना एक आदर्श पती व मुलांना एक आदर्श पत्नी हवी असते. तसा ते प्रयत्नही करीत असतात, पण यश कमीच
लोकांना मिळते. या संदर्भात एक चुटकाही प्रसिद्ध आहे. एका अविवाहीत माणसाला त्याच्या मित्राने विचारले मित्रा तू लग्न का केले नाहीस? तो म्हणाला की आदर्श पत्नीच्या शोधता होतो. मिळाली की नाही? मित्राने उत्सुकतेने विचारले मिळाली, पण तिलाही आदर्श पतीच हवा होता. थोडक्यात सांगायचे म्हणजे अशी अवाजवी अपेक्षा बाळगणारे यशस्वी होत नसतात. यासाठी वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या पती पत्नींनी सामंजस्यनेच वैवाहीक संबंध राखायला हवेत.

 नवविवाहीत पती-पत्नींनी एकमेकांना

समजण्याऐवजी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कारायला हवा आणि असत्य, अहंकार आणि प्रदर्शन
टाळायला हवे. पतीशी आणि सासरच्या माणसांशी असलेले मतभेद प्रेमाने आणि सन्मानाने मिटवावेत. आपल्या भारतीय समाजात सुरूवातीपासूनच मुलींच्या मनात सासु विषयीची नकारात्मक प्रतीमा
कोरली जाते आणि भावी जीवनात सासू आणि सासरच्या इतर माणसांशी संबंध जुळयतांना तिला गैरसमज विरहित राहू दिले जात नाही. हेच या समस्यांचे मुळ आहे. मुलीसाठी आपल्या आई वडीलांची साथ सोडणे सर्वात कठीण गोष्ट असते.
त्यातून मुलीची आई जहाँबाज स्त्री असेल तर ती मुलीचा रिमोट कंट्रोलसारखा वापर करून जावायाला नमवू पहात असते. पतीनेही आपल्या पत्नीला दारातील कोणीही पाय पुसू शकेल असे पायपुसणे
समजू नये. प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान असतो. सतत लाथाळत राहिल्यास तो कधीही उफाळून येऊ शकत असतो. हे दोघांनीही लक्षात ठेवायला हवे, यासाठी संसारात मैत्रिचे, परस्पर सामंजस्याये
आणि विश्वासाचे नाते असणे अत्यंत गरजेचे असते. तरच संसार यशस्वी होत असतो.

संशय मनी आला त्याचा घात झाला…

संशय हा गती पोखारणारा किडा असतो. संशय मनात आल्याक्षणीच त्याचा सोक्षमोक्ष लावणे आवश्यक असले तरी नात्यांचा ओलावा,
संवेदनशीलता, समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया अशा अनेक गोष्टींवर सगळे अवलंबून असते मग संशयाचा किडा अनेकांच्या मनात दडून बसतो. एकदा का त्याची लागण झाली की सोक्षमोक्ष लागेपर्यंत मनुष्य स्वस्थ बसत नाही. परंतु अनेक वेळा असा समज गैरसमज ह्यामधून संशय वाढत जाऊन उग्र रूप धारण करतो. त्यामुळे अनेक सुखी संसार उध्वस्त होतात. म्हणूनच अशा संशय रुपयाला वेळीच आवर घालायला हवा.

 संशय अनेक मोठमोठ्या कुटुंबांचा जीवाभावाच्या व रक्ताच्या नात्यांचा नाश करतो. पती-पत्नी, मित्र-मैत्रीण, सासू-सून, बाप-मुलगा, भाऊ-भाऊ अशा नात्यांना सुरंग लावण्याचं काम संशयामुळे होते. मग अशावेळी अगदी रक्ताची नातीही दुरावतात. वादविवाद निर्माण होतात. एखाद्याच सुख-समाधान भरभराट हे संशयरुपी किड्याला बघवत नाही. संशयरूपी किड्याला खतपाणी घालणारे आणि त्यांचा सांभाळ करणारेही आपल्या आसपासच असतात. राग, द्वेष, अहंकार, गर्व हे त्यांचे मित्र समजावेत परंतु समजूतदारपणा, विचार, संयम व नम्रता अशा अस्त्रांचा वापर केला तर सहज त्याचा नायनाट करता येतो.

संसारात सुखाचे क्षण वेचता आले पाहिजेत

चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता. अवती भोवती पाहता पाहता हळूच चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते अरेच्या! साखरचं घालायला विसरलो कि काय ? … पुन्हा जाऊन साखर घालायला कंटाळा आलेला तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता. आणि नजरेस पडते ती कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर.

संसार असाच असतो. आयुष्य असच असतं. सुखाचे शांत तुमच्या अवती भोवतीच असतात. त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आलं पाहिजे. आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आले पाहिजे.

  संसाराच्या रंगमंचावर असे समजूतदारपणे वावरा कि तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा आठवणी मागे राहायला पाहिजे. जगातील सर्वात महाग काय तर अश्रू, कारण त्यात एक टक्का पाणी आणि 99 टक्के भावना असतात. म्हणून कुटुंबात हसत रहा आणि हसवत राहा.

समजूतदार पणा मुळे नात्यातील गोडवा टिकून राहील

नव्या घरात प्रवेश करतांना मुलींच्या मनात अनेक प्रश्न उभे राहत असतात. नवे घर कसे असेल ? सासू-सासरे कसे असतील ? आपण घरात सामावू शकू का नाही ? यावेळी सासूच्या मनातील अनेक प्रश्न येत असतात. नव्या सुनेशी आपलं पटेल की नाही ? ती आपला मान राखील का ? सर्वांना सांभाळून घेईल का ? इत्यादी.

 यासाठी दोघींनी थोडा समजूतदारपणा दाखवला तर नात्यातील गोडवा आयुष्यभर टिकून राहील.

सून व्हाल तेव्हा…

 सासू आपल्या आईपेक्षाही उत्तम असते. जर आपण आपल्या आईच्या रागावण्याचे वाईट वाटून घेत नसाल तर सासूच्या बोलण्याचे वाईट का वाटून घ्यावे. सासरचे रितीरिवाज पाडावेत. जर सासरी एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर तो मनाला लावून घेऊ नये. जर आपण नोकरी करत असाल तर घरकामाचा सारा भार सासूवर टाकू नये. सासूचे सांगणे वायफड समजू नये. तिच्या मनाविरुद्ध कोणते काम करू नये.

पतीची भूमिका :

 पती-पत्नी गाडीच्या दोन चाकांसारखे असतात. ती समान पद्धतीने चालत राहिली तर गाडी योग्य मार्गावर राहील. ती चालवण्याची जबाबदारी फक्त पत्नीच नसते. तिला ताळमेळ बसवायला थोडा वेळ लागतो. तो वेळ तिला अवश्य तिला द्यावा. पत्नी कमावती असेल तर तिला नोकरी सोडण्यास न सांगता तिला साथ द्यावी. पत्नीच्या गरजा ध्यानात घेऊन तिला वेळ देणे आपले कर्तव्य आहे. जर पत्नी आपल्या नातेवाईकांना विषयी आपल्याला काही सांगत असेल तर ते आपल्या पुरतेच ठेवावे. जर सासू सुनेत  काही वाद झाला तर कोणीही एकाची बाजू घेऊ नये. दोघींचे म्हणणे ऐकूनच कोणताही निर्णय घ्यावा.

सासूने हे समजून घ्यावे

 सुन आल्यामुळे आपला मुलगा आपल्यापासून दुरावला आहे असे समजू नये. जर सुन गुणी असेल तर सासूला ती प्रतिस्पर्धी असल्यासारखे वाटू लागते. खरे तर अशावेळी सासूने तिला प्रोत्साहित करायला हवे. जर काही कारणांवरून मतभेद किंवा वाद झाला तर त्याला मुद्दा बनवू नये. परस्परांमध्ये विश्वासाठी भावना राखावी. त्यामुळे नात्यातील प्रेम टिकून राहत असते. आपल्या मुलींशी कधीही वागावेसे वाटले नसेल तसे आपल्या सुनेशी कधीही वागू नये. सुन तिचे घर, माणसे सोडून आपल्याकडे आलेली असते. त्यामुळे तिला आपल्या घरातील एका सदस्याप्रमाणे आपल्या घरात सामावून घ्यावे. तिला परकेपणा जाणवू देऊ नये. सुनेला आपल्या घरातील रितीरिवाज माहित नसतील तर त्यावरून तिला न रागवता आपले रितीरिवाज शिकवावेत. ती नोकरी करत असेल तर घर कामात तिला मदत करावी नोकरीवरून वाद घालू नये.

  आजच्या विवाहित महिला लग्नावेळी लहान नसतात. त्यामुळे त्यांनी लग्नानंतर थोडे समजूतदारपणे वागायला हवे. सासरच्या संपूर्ण कुटुंबाला आपले मानायला हवे. लहानांवर प्रेम करायला हवे. तर मोठ्यांचा मान राखायला हवा. आज बऱ्याच नवविवाहीतांबाबत जे काही होत आहे त्याला मुलींच्या मनातील सासर बद्दलची दुर्भावना हे ही एक कारण आहे. जर सर्वांची प्रेमाचे, सलोख्याचे, सहकार्याचे संबंध राहिले तर ती निश्चितच आपले कुटुंब सुखी समृद्धी व एकजीव राहू शकेल.
 

लेखन - श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर, बोराडी, आदर्श शिक्षिका व महिला संघटक, अ. भा. ब. स. महासमिती.

1 Comment

  1. ताई
    आपले म्हणणे खरे असेल
    परंतु बऱ्याच घरात सुनेला कामवाली समजतात

Leave a Reply

Your email address will not be published.


*