‘मान्य आहे शून्यातूनी , तू लयी वरती चढला..’पण सांग तू गड्या समाजाच्या काय कामी पडला…?
‘धनामधली कोणासाठी
मोडली नाही काडी…
दरवर्षाला स्वतःसाठी ,
घेत गेला ‘गाडी…
दिला नाही ‘ कांदा जरी
घरी तुझ्या सडला……
‘सांग तू जरा समाजाच्या काय तू कामी पडला….?
तुझा नित्त्य चढत आहे
मजल्यावरती ‘मजला….
लहानपणीचा तुझाच ‘यार ‘
ऊघड्यावरती निजला…!
तुझ्यामधला मित्र गड्या
सांग कुठे दडला…?
‘सांग तू जरा समाजाच्या काय कामी पडला…?
‘गरिबीनं गांजलेली
माणसं आला बघत…
तरीही तू आपल्याच आहे ,
मस्तीमध्ये ‘जगत….
तुझ्यावाचून नाही जरी
संसार त्यांचा ‘अडला…
पण सांग तू जरा समाजाच्या काय
कामी पडला…?”
‘जन्मल्या त्या समाजाचा
जरा ऋणी राह्य तू….
‘मागे राह्यल्या समाजाला ,
मागे वळून पाह्य तू…
कोणी नाही पुसत ऊद्या ,
तू कितीही ‘मोठा घडला…
सांग तू जरा समाजाच्या काय कामी पडला..? *सुंदर कविता*
संग्रहित…
ही लेखणी समाजासाठी
????????

Leave a Reply