प्रा. मधुकर कोटवे सरांचे पहिले UPSC IAS EXAM वर लिखित पुस्तक प्रकाशन उद्या पासून अमेझॉन आणि फ्लिककार्ट वर उपलब्ध – श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

श्री.मधुकर कोटवेसर यांचा अल्प परिचय. श्री.मधुकर कोटवेसर, मुळचे बर्हाणपुर एम. पी येथील रहिवासी असून ते दिल्लीच्या न्यु फ्रेंड्स अकॅडमी तथा इंडीयन ॲडमिनीस्ट्रेटिव्ह सर्हिसेसचे गेल्या १५ वर्षापासून संस्थापक संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते स्पर्धात्मक परिक्षांचे एक ख्यातनाम मार्गदर्शक,समीक्षक व परिक्षक आहेत. विविध स्पर्धात्मक परिक्षासांठी जेष्ठ प्राध्यापक म्हणून ज्ञानार्जन करतात. सध्या ते Unacademy मध्ये लाईव्ह क्लास व्दारे मार्गदर्शन करीत असतात. तसेच खालील संस्थांमध्ये त्यांचे अविरत कार्य चालू आहे….
१.जीएस वर्ल्ड,नवी दिल्ली.
२.एएल्एस्-आयएएस् दिल्ली.
३.उत्कर्ष क्लासेस,जोधपूर.
४.साम्यक कूलासेस,जयपूर.
तसेंच ते स्वतंत्ररित्या विविध वाहक मॕगेझिनस् चे संपादकीय कामही करतात. तसेच सरांच्या मार्गदर्शनाखाली

IAS/IPS approximately 100+
SDM/DSP Approximately 250+
In various one day exam
1000+

अधिकारी तयार झालेले आहेत. सरांचा UPSC स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील अनुभव हा खुप काही सांगुन जाणारा आहे. १६ विषयांपैकी सर १२ विषयांवर मार्गदर्शन करीत असतात. आणि ही खुप अभिमानाची बाब आहे. कोटवे सर हे खरे समाज भुषण आहेत.

तसेच सामाजिक कार्यात पण त्यांचा उत्सुर्त सहभाग असतो. बडगुजर प्राऊड ग्रुप व युवक समिती तर्फे ते समाजातील विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. तसेच वेब पोर्टल मार्फत त्यांचे महत्वपुर्ण लेख, आणि मार्गदर्शन पर लेख आपण नेहमीच प्रसारित करीत असतो. तरी सर्व समाजबांधवांनी सरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा लाभ घ्यावा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी.


श्री.कोटवेसरांचे येत्या २-३ दिवसात ॲमेझाॕन व फ्लिपकाॕर्टवर युपीएससी तथा आएएस परिक्षांचे पहिले पुस्तक उपलब्ध होत आहे.

पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीसह श्री. मधुकर कोटवे सर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*