धुळे : एका विवाह सोहळ्यासाठी शुक्रवारी धुळे दौ-यावर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान कॅबिनेट मंत्री, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी गोंदूर विमानतळावर सकाळ पेपरचे धुळे जिल्हाप्रमुख तथा खानदेश आवृत्तीचे असीस्टंट चीफ रिपोर्टर निखिल निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी विविध विषयावर हितगुज साधले. मंत्री महोदय थोरात हे श्री. सूर्यवंशी यांचे चांगले स्नेही आहेत.
राज्यातील सत्ता परिवर्तनात काँग्रेससह प्रदेशाध्यक्ष थोरात यांचा मोठा वाटा आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर मंत्री थोरात प्रथमच धुळे दौ-यावर होते. तो त्यांचा खासगी दौरा होता. त्यावेळी गोंदूर विमानतळावर श्री. सूर्यवंशी यांनी मंत्री थोरात यांची सदिच्छा भेट घेतली. संयुक्त चर्चेत राज्य सरकार पाच वर्षे टिकेल का, कुणी बंड तर करणार नाही ना, धुळे जिल्ह्याला आमदार कुणाल पाटील यांच्या रूपाने मंत्रिपदाची होणारी मागणी आदी मुद्यांचा समावेश होता. त्यावर मंत्री थोरात यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली. तसेच राज्यात सत्तास्थापनेबाबत आणि मा. थोरात सो. यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल त्यांचे श्री. सूर्यवंशी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.


Leave a Reply