होमिओपॅथीच्या डॉक्टरांचे कर्तव्य? – डॉ. घनश्याम बडगुजर, जळगांव

पेशंटने उघड, मनमोकळी, मनातील, हृदयातील, कौटुंबिक, व्यवसायिक ,सामाजिक, धार्मिक, सर्व माहिती सांगितली.
व ती समजून, डॉक्टरांनी बरोबर औषध निवडले तर ज्या दिवशी तुम्ही होमिओपॅथिक औषध घेता, त्यादिवशीच, तुमचे जगणे सुसह्य झाले पाहिजे, पेशंट म्हणतो, हो डॉक्टर आता मला बरं वाटतं. म्हणजे मी, आता जगू शकतो. याला म्हणतात ,डॉ. हनिमान यांची होमिओपॅथी. मग आजार जुना असो, नवाअसो ,की जीव घेणा घातक. होमिओपॅथिक फिलासफी. सूत्र क्रमांक एक व दोन नुसार, डॉ. हनिमन यांनी रोग्याला लवकर व कायमचा बरा करणे, हे एकमेव व उच्चतम उद्देश डॉक्टरांना दिलेला आहे. आम्ही खोट बोलत असू तर इतर सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांना विचाराच. कारण डॉ. हनिमन यांना माहीत होते, की डॉक्टरांचे लक्ष ह्या, उद्देशापासून वेगळ्या उद्देशा कडे गेले, तर वर्ष वर्ष केस चालत राहिल .जाणकार समजून घेतील .काही केसेस अपवाद असतो ( जे पेशंट हृदयातील माहिती सांगत नाही ते) व होमिओपॅथी ला डॉक्टर लोक बदनाम करतील की आमच्या होमिओपॅथी चाच उशिरा ,लेट गुण येतो व आज पर्यंत तसेच होत आलेल आहे . म्हणून डॉक्टरांचे कर्तव्य काय हे लिहिण्याची इच्छा झाली. आणि रोग्याला लवकर व कायमचे बरे करणे, हीच आदर्श पद्धत सांगितली आहे व असाच डॉक्टर आदर्श- ज्ञानी. दुसरी खून नाही.  जगात कुठेही औषध घ्या पण हे सत्य ध्यानात ठेवा. म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही. जो डॉक्टर रोग्याला लवकर व कायमचा बरा करतो तो आदर्श ज्ञानी. हा एक नियम झाला. नियम आला की अपवाद आला.
हा प्रत्येक रोग्यासाठी लागू करता येत नाही कारण डॉक्टरांच्या बुद्धीच्या मर्यादा व रोगी सर्व हृदयातील ,दुःख, टेन्शन पहिल्याच भेटीत सांगत नाही. त्यामुळे बरोबर औषध निवडून देता येत नाही. होमिओपॅथीचा जगात सर्वात ज्ञानी डॉक्टर सुद्धा. संपूर्णतः रोग्याने हृदयातील मनातील सर्व वेदना दुःख डॉक्टरांना माहिती सांगणे या गोष्टींवर अवलंबून असतो. कारण होमिओपॅथी म्हणते मनाच्या वेदना ,मनाच दुखणे, हे शरीरावर प्रगट होते .आजाराच्या रूपाने हे जागतिक, नैसर्गिक, त्रिकाल अबाधित, सत्य आहे. या आमच्या सांगण्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण आपली बुजुर्ग, जनसामान्य लोक, हेच सत्य रोज अजाणतेपणे सांगत असतात. ते म्हणतात ,फिक्र इंसान को खा जाती है. फिक्र इंसान को जला डालती है .मेलेल्या माणसाला चिता जाळते .जिवंत माणसाला चिंता. मग जाळणार कशी आजाराच्या रूपाने. व सर्व धर्मग्रंथ म्हणतात सहा विकार हेच खरे विकार आहेत. वरील हे सत्य समाजाला माहीत पाहिजेच. म्हणून याला एक उपनियम तयार होतो. की, ज्या डॉक्टरांकडे, जास्तीत जास्त रोगी लवकर व कायमचे बरे होतात, तोच ज्ञानी. ज्या डॉक्टरांकडे शंभर तून 50 पेशंट ला पहिल्या पंधरा दिवसात बरे वाटते, तो श्रेष्ठ डॉक्टर ओळखावा. 100 आतून 60 पेशंट च्या वर पंधरा दिवसात बरे वाटणे, हे अति श्रेष्ठ डॉक्टरांचे लक्षण आहे ,हे वैयक्तिक माझे मत आहे.
ही माहिती दवाखान्यात बसलेल्या रोग्यांना पेशंट विचारून घेऊ शकतो. साध्या भाषेत सांगायचे तर जो डॉक्टर घरातून दवाखाना लवकर कायमचा काढून देतो तोच डॉक्टर श्रेष्ठ . हे सत्य माझ्यासाठी सुद्धा आहे. जगात सर्व  डॉक्टरांसाठी  लागू आहे . आपली फसवणूक होऊ नये म्हणून सत्य  आपल्यासमोर. आपल्याला पाहिजे तिथे होमिओपॅथिक औषध घ्या. पण वरील सत्य ,सदैव लक्षात असू द्या. ज्ञानी डॉक्टर ओळखण्याची यापेक्षा जगात कोणतीही खून नाही ,नाही ,नाही. व लावणे सुद्धा अज्ञान पणाचे आहे. डॉ. घनश्याम बडगुजर .स्वातंत्र्य चौक. जळगाव. Mob: 94 20 3819 22, 9404256053डॉ. प्रशांत. एमडी .जळगाव .व संपूर्ण होमिओपॅथिक जागृती मंच द्वारा, समाजप्रबोधन करून दुःख मुक्तीसाठी एक पाऊल.हा संदेश महाराष्ट्रभर, भारतभर ,घराघरात, पोहोचवा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही व मानवजात दुःखातून मुक्त होईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*