सप्रेम नमस्कार, सर्व समाज बांधवांना माझा सप्रेम नमस्कार.
पेशंटने सर्व मनातील, हृदयातील माहिती सांगितली व डॉक्टरांनी बरोबर औषध निवडून दिल्यास कोणताही आजार व कोणतेही व्यसन सुटते म्हणजे सुटतेच. कोणताही आजार बरा होतो म्हणजे होतोच .हा सर्वसाधारण नियम आहे .आणि प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.
व्यसन हा एक मानसिक आजार आहे. असं होमिओपॅथी म्हणते .होमिओपॅथी म्हणते , त्या व्यक्तीच्या ,मनामध्ये, शरीरामध्ये ,कोणत्या तरी गोष्टीची, नैसर्गिकमानसिक स्थितीची ,सुखाची कमी असते. आत्मविश्वासाची कमी असते अशाप्रकारे व्यसन करून ,ती कमी भरून काढण्यासाठी ,ती व्यक्ती कोणत्या तरी व्यसनाच्या आहारी गेलेली असते व त्या सुखाची कमी भरून, नैसर्गिकमानसिक स्थितीची .आत्मविश्वासाची उनिव भरून काढत असते
पण त्यासाठी त्या पेशंट ने सर्व टेन्शन व्यवसायिक , कौटुंबिक, आर्थिक चिंता, डॉक्टरांना सांगणं आवश्यक असते, डॉक्टर बरोबर औषध निवडून देऊन, तुम्हाला म्हणजे रोग्याला बरा करत असतो,. बरं झाल्यानंतर त्या रोग्याला आतूनच त्या व्यसनाची गरज वाटत नाही. एकदा तुम्ही होमिओपॅथिक औषधाने पूर्ण बरे झाला की तुम्हाला ते व्यसन करण्याची गरज वाटत नाही. पण तुमचे जुने मित्र ज्यांच्या सोबत आपण व्यसन करत असतात. ते तुम्हाला आग्रह करत असतात आणि अशा आग्रहाला तुम्ही बडी पडलात तर पुन्हा व्यसन लागण्याची शक्यता असते .जसे कोणीही नवीन व्यक्तीने व्यसन सुरू केलं तरी तो व्यसनाधीन होऊ शकतो. एक साधा नियम आहे . तर अशा वेळेस आपण मित्रांच्या आग्रहाला बळी पडू नये.
खरे म्हणजे तंबाखू. सिगारेट. दारू, किंवा तपकीर ओढणे, तपकिरी ने दात घासणे, किंवा मिशी किंवा मिश्री ओढणे, गांजा ओढणे, अशा प्रकारची व्यसन करणारे लोक ही कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावात असतात. अनेक टार्गेट पूर्ण करण्याचे उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर असते व त्याच तणावात ती असतात म्हणून असे कोणत्यातरी प्रकारचे व्यसन करून ते त्या तणावात प्रत्यक्ष क्षनिक रिलीफ मेहसूस करत असतात .जर एखाद्या गोष्टीमुळे प्रत्यक्ष रिलीफ तणावात येत असेल तर कोणीही एखाद्या वेदनाशामक गोळी सारखा सहज व्यसनांच्या आहारी जातो येणाऱ्या परिणामाची चिंता माहित असताना सुद्धा .
अनेक लोक तंबाखू, गुटका ,तोंडात टाकता बरोबर त्यांना अतिशय प्रेरणादायी, उत्साही ,स्फुरण आल्यासारखे वाटते. त्यामुळे अनेक कठीण कार्य सुद्धा सोपे असल्यासारखे वाटत असते .
कोणतेही व्यसन हे त्या व्यक्तीचे मानसिक कमकुवतपणा चे लक्षण आहे व तो कमकुवतपणा व्यसनाने भरून निघत असतो. एखाद्या पदार्थाचे व्यसन हे अप्रमानित औषधाप्रमाणे कार्य करत असते. त्याने तात्पुरते बरे वाटते पण सदैव घेत राहिल्यास त्याचे शरीरावर नंतर दुष्परिणाम येतातच.
होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जेव्हा तुम्ही एखाद्या आजार बरा करण्यासाठी येतात .त्यावेळेस आम्ही काही ,हे सांगत नाही ,की हे व्यसन बंद करा. ते व्यसन बंद करा. कारण कोणत्याही बुद्धिवंत होमिओपॅथिक डॉक्टरला, हेच माहीत असते हा व्यसन करणारा व्यक्ती काही वेडा नाही. त्याला सर्व गोष्टीची समज आहे. तरी तो करतोय व्यसन. कारण तो मानसिक आजारी आहे .तो त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून त्याला आजार म्हणतात.
डॉक्टरला एवढेच माहीत असते .आपण याला बरोबर औषध निवडून दिले, तर हा आपोआप हे व्यसन सोडून देईल किंवा कमी करेलच. न सांगता. म्हणूनच पेशंटला बरोबर औषध निवडून दिल्यास रोगी नंतरच्या काळात सांगतो ,डॉक्टर आता मी टेन्शन घेतच नाही. ते व्यसनही सिगरेटचे कमी झाले. तंबाखूचे कमी झाले. दारूचे कमी झाले. आणि हे सर्व न सांगता होत असते. इतरही अनेक सामाजिक वेसन आहेत येथे नमूद करणे सुद्धा कठीण आहे. उदाहरणार्थ अनेक लोकांना चोरी करण्याची सवय असते. जी चांगल्या घरातली असतात . मोठी असतात .त्यांना एखादी वस्तू आवडली , कि ती वस्तू चोरल्या शिवाय ते राहू शकत नाही . त्यांच्यावर नियंत्रण राहत नसते. अनेक लोकांना व्याभिचार . करण्याची सवय असते. सर्व व्यसनांवर होमिओपॅथिक श्रेष्ठ औषध आहेत
अनेक लोकांना सट्टा खेळणे .पत्ता खेळणे. लॉटरी खेळणे. लहान मुलांमध्ये मोबाईल खेळण्याचे व्यसन असते .असे जगातल्या ही कुठल्याही व्यसनावर होमिओपॅथीमध्ये औषध आहेत मात्र औषध निवडण्यासाठी डॉक्टर संपूर्णतः पेशंटच्या माहिती सांगण्यावर अवलंबून असतो .सर्व लिखाण ईश्वरी प्रेरणेने म्हणून ईश्वराला समर्पित .
डॉ घनश्याम बडगुजर. स्वातंत्र्य चौक . डॉ प्रशांत एमडी जळगाव .९४२०३८१९२२.९४०४२५६०५३
संपूर्णतः होमिओपॅथीक जागृती मंच द्वारा जनहितार्थ. संपूर्ण मानव जातीच्या दुःख मुक्तीसाठी, हा संदेश घराघरात पाठवा महाराष्ट्रभर. समाज प्रबोधन करून दुःख मुक्तीसाठी एक पाऊल .

संपूर्ण मानव जातीच्या दुःख मुक्तीसाठी कुठलेही व्यसन सोडण्याकरीता आपण समाज प्रबोधन करत आहात. खुप छान व उपयुक्त माहिती तसेच होमियोपॅथीक इलाज. आपल्या निस्वार्थ सेवाभावी कार्यासाठी आपणांस व होमियोपॅथीक जागृती मंचच्या टीमला शुभेच्छा व धन्यवाद ! ?