सोनशेलू चामुंडा माता मंदिरावर अष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम, रक्तदान शिबिरात 54 जणांनी केले रक्तदान

सोनशेलू चामुंडा माता मंदिरावर ५४ दात्यांचे रक्तदान

रक्तदान करतांना रक्तदाते

शिंदखेडा-तालुक्यातील सोनशेलू येथील चामुंडा माता मंदिरावर नवरात्रोत्सवानिमित्त दि.६ ऑक्टोबर रविवार रोजी अष्टमीच्या दिवशी होमहवन, महाआरती, महाप्रसाद व भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ५४ दात्यांनी आपले रक्तदान केले. कार्यक्रमास सुमारे दोन ते अडीच हजार भाविकांची हजेरी लाभली.

गणेश बडगुजर प्रस्तुत माँ चामुंडा अल्बमचे प्रकाशन करतांना मान्यवर


सकाळी ९ वाजता होमहवनाला सुरुवात झाली. त्यानंतर १०.३० वाजता महाआरती झाली. तर ११ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावर्षी महाप्रसादाचे मानकरी संजय धुडकूशेठ बडगुजर (शिंदखेडा), रवींद्र मोहनशेठ बडगुजर (शहादा) हे होते. तसेच चामुंडा माता ट्रस्ट, बडगुजर समाज सोनशेलू आणि अ.भा.बडगुजर समाज युवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बडगुजर प्राउड ग्रुप, सरस्वती मिशन, नवोदय मंच सहकार्याने सकाळी १० वाजता नवनिर्वाचित अध्यक्ष माधवराव बडगुजर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महासचिव राजेंद्र बडगुजर, ईश्वर सर बडगुजर, पी.डी.बडगुजर सर, सुधीर बडगुजर, विजय बडगुजर, रवींद्र बडगुजर सह मान्यवर उपस्थित होते. तसेच गणेश बडगुजर (यावल) यांनी चामुंडा माता देवीवर तयार केलेल्या यु-ट्युब अल्बमचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

रक्तदान करतांना रक्तदाते, महिलांनीही केले रक्तदान
चामुंडा मातेची पुजा करतांना भाविक आणि मानकरी

याच कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ५४ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी महिलांनीही उत्स्फुर्तपणे रक्तदानासाठी आपला सहभाग नोंदविला. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिरास किशोर बडगुजर (खारघर), प्रा.सी.डी.साळुंखे (कॅनडा) यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

बडगुजर प्राऊड ग्रुपचे श्री. प्रशांत बडगुजर रक्तदान करतांना सोबत उपस्थित मान्यवर

कार्यक्रम यशस्वीतेसाठी करण्यासाठी भाईदास बडगुजर, महेंद्र बडगुजर, डिंगबर बडगुजर, महेश बडगुजर, रवींद्र बडगुजर, दिलीप राघो बडगुजर, किशोर बडगुजर, संतोष बडगुजर, रमेश बडगुजर, दिलीप बडगुजर, राजेंद्र बडगुजर, दंगल बडगुजर, धीरज बडगुजर, सुधीर बडगुजर, विजय बडगुजर, अमोल बडगुजर, अश्विन बडगुजर, देविदास बडगुजर, रवींद्र बडगुजर तसेच कार्यक्रमास पंचक्रोशितील नागरीक तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. एखाद्या रुग्णास रक्ताची गरज भासल्यास किशोर बडगुजर (९२२३३००८५०), गोपाल बडगुजर (९४२१६१४६३७), धीरज बडगुजर (९७६७५६८३६५) यांच्या संपर्क साधावा, ते माफक दरात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतील.

सोनशेलू येथील चामुंडा माता मंदिरातील चामुंडा मातेची मुर्ती

2 Comments

  1. सोनशेलू भव्य सोहळा.
    आदरणीय सर्व मान्यवराची उपस्थिती.
    अभिनंदन.
    शुभेच्छा!

    * Dr D D B.

Leave a Reply to Dr.D.D.Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*