चि.शुभम दिलीप बडगुजर, याची चिफ मिनिस्टर फेलोशिपसाठी निवड – डॉ. श्री. दि. धो. बडगुजर

आपल्या बडगुजर समाजातुन निवडल्या गेला ‘chief minister fellow!’
समाजासाठी अभिमानाची आणि प्रेरणा देणारी बाब ! !

चि.शुभम हा पंधरा दिवस झाले एक वर्षाच्या फेलोशिप साठी रुजू झालाय. ४५०००/–रू विद्यावेतन दरमहा मिळते.
प्रशासकीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेत स्पर्धा परीक्षा तयारी करायला वेळ काढून अभ्यास ही करावा ….. करणारा करू शकतो.

माननीय जि.प.सि.ई.ओ. सरांचे प्रत्यक्ष रोज कामकाजात मार्गदर्शनही लाभते ;हे विशेष.

-बडगुजर समाजातून प्रथम ‘सी.एम.फेलो’ तो झाला आहे.-

परीक्षा, निबंध सादर,मुलाखत व एखाद्या संस्थेत कामकाजाचा थोडा अनुभव यातून निवड होते. वर्तमानपत्रात जाहिराती तीन चार महिन्यांपुर्वी आलेल्या होत्या. Job alerts for Badgujar आणि रोजगार ग्रुपलाही होत्या.

अशा संधींचा शोध घेतला पाहिजे.
शासनमान्य एखाद्या संस्थेत काही कार्यात/ प्रकल्पात सहयोग हा स्पर्धा परीक्षा देणार्याने करावा. असे प्रमाणपत्र कामातही पडते.

‘स्मार्ट व हार्ड’ वर्क व ‘स्मार्ट स्किल’ दोन्ही बाजू सांभाळा. संधी शोधत रहावे. काही तरी पदरी पडतेच.

पी.एम. फेलोशिप तसेच बँकेच्या फेलोशिप ही उपलब्ध आहेत. त्यांचे विद्यावेतन मात्र फार जास्त नसते. जागा निघतात ; तेव्हा बघत जावे. ??

चि. शुभम ला मिळालेल्या फेलोशीप बद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. आणि हे सर्व करत असतांंना त्याच्या माता पित्याचे सौ. स्वाती ताई आणि डॉ. दिलीप बडगुजर यांचे अनमोल मार्गदर्शन, सहकार्य आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे शुभम हा उत्तरोत्तर यश गाढत आहे. त्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. यशवंत हो… किर्तीवंत हो…

शुभेच्छूक : अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप

लेखक: डॉ दिलीप धोंडू बडगुजर
अमरावती.

1 Comment

  1. मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व
    पूढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !
    यशवंत हो…? किर्तीवंत हो…?

Leave a Reply

Your email address will not be published.


*