कलाकार आपल्या कलेचा उपयोग कशा पध्दतीने,कुठे करेल ते सांगणे अशक्यच. असेच एक कलाकार आपल्या समाजाला लाभले आहेत ते म्हणजे श्री. नरेंद्र बडगुजर, औरंगाबाद. श्री. नरेंद्र यांनी आपल्या सूक्ष्म कला कौशल्याच्या साह्याने आगऱ्याचा ताजमहल सारख्या इतर अनेक कलाकृती बंदिस्त बल्बमध्ये साकारल्या आहेत. त्या कलाकृती पाहणाऱ्या व्यक्तीला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही हे तेवढेच खरे..!
श्री. नरेंद्र बडगुजर हे मुळ गाव धरणगांव, जि. जळगांव येथील राहणारे आहे, सद्याला ते औरंगाबादला वास्तव्यास आहेत. बालपणापासून नरेंद्र यांना कलेची आवड आहे. त्यांना ज्वारीच्या काडी पासून बैलगाडी, रंगीत टोपी, घर बनविणे, मातीचा गणपती व वस्तु बनविणे,चित्र काढणे, रांगोळीवर चित्र काढणे, पर्यावरण वर पोस्टर रंगवीने, स्लोगन लिहिणे, गणेश उत्सवात डेकोरेशन करणे, रक्तदान शिबीरात भाग घेणे या सारख्या गोष्टींची आवड आहे.
नरेंद्र यांनी बाटलीत कलाकृती साकारल्या जातात, असे ऐकले होते. आपण तशी कलाकृती करू शकतो का?. अशी जिज्ञासा नरेंद्र यांच्या मनात आली आणि त्यांनी ६० होल्टच्या बल्बात ही कलाकृती साकारण्याचा संकल्प केला व त्यात ते यशस्वी झाले (डिसेंबर-२००४). नरेंद्र हे ६० होल्टच्या बंद (उडालेला) बल्बचे फक्त वरच तोंड फोडता. जी कलाकृता तयार करायची आहे, तिची बाहेर आकृती काढुण आगपेटी व कुल्फीच्या काड्या त्या आकाराने कापुन त्याबरोबर कापल्या आहेत का? याची ते आगोदर बाहेर जुडणी करतात. त्यानंतर बारीक चिमटा, फेविकॉल यांच्या सहाय्याने मधील सूक्ष्म जुडणी करतात. ही जुडणी करण्यास त्यांना एका कलाकृतीला दोन दिवसाचा अवधी लागतो. जेव्हा ही कलाकृती त्या बंदिस्त बल्बात तयार होते, तेव्हा ही जुडणी एवढ्या छोट्याशा बल्बाचा तोंडातून कशी केली असावी, असा प्रश्न पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
नरेंद्र यांनी आता पर्यंत ताजमहल, श्री स्वामी समर्थ मंदिर,श्री गणेश मंदिर, बंगला, श्री बालाजी रथ, क्रिकेटचे मैदान, गेट वे ऑफ इंडिया, बीबी का मकबरा या सारख्या रंगीत व थ्रीडी कलाकृती बनविल्या आहेत. नरेंद्र यांची ही कलाकृती लोकमत, जळगांव १ फेब्रवरी २००५, मासिक गुर्जररत्न, जळगाव १५ मार्च २००५, गॅब्रियल इं.लि. नाशिक २००७, इंडुरन्स इं.लि. औरंगाबाद मासिक सुवार्ता- २०१७ ला प्रसिध्द झाली आहे. तसेच साप्ताहिक बडगुजर समाजदूत मध्ये पोस्टर्स स्पर्धेत द्वितीय आल्याचा वृत्तांत ९ एप्रिल २०१९ ला प्रसिध्द झाला आहे.
याव्यतिरिक्त त्यांना पोस्टर बनविणे, पेटींग करणे इ. कलाकृती आणि त्यातून सामाजिक संदेश देणे. तसेच ते पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच महत्वपूर्ण मेसेज आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून देत असतात. या व्यतिरिक्त ते एक कुशल सामाजिक कार्यकर्ते असून अ. भा. ब. स. युवक समिती सदस्य देखील आहे आणि ती भूमिका पण चोखपणे बजावितात. तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड गाठण्याचा मानस त्यांचा मानस आहे. त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
अ.भा.ब.स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप





Thanks to all badgujar web portal team, A.B.U.Samiti & Badgujar provide team…