अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या अध्यक्ष पदी वर्षी येथील श्री माधवराव जानकीरामशेठ बडगुजर यांची निवड

♦♦♦♦♦♦♦♦♦

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती ची कार्यकारणी मासिक सर्व साधारण सभा हर्ष उल्हासात आज दिनांक 8 सप्टेंबर 2019 रोजी धुळे येथील बडगुजर समाज बोर्डिंग याठिकाणी अध्यक्ष ,सचिव यांच्यासह सर्व कार्यकारी मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सदर सभेचे अध्यक्ष माननीय श्री आप्पासो उमेशजी करोडपती हे होते या सभेमध्ये मागिल सभेचे मुख्य मुद्दे कार्यकारणी समोर मांडण्यात आलेत.त्यानंतर तत्कालीन सभेतील मुख्य विषयांवर चर्चा करण्यात आले. महा समितीअंतर्गत असलेल्या विविध समितींचा आढावा, आयोजन, नियोजन व केलेली कार्य या विषयी चर्चा तसेच अहवाल प्रत्येक समिती प्रमुख यांनी सादर केलेत.
या मासिक कार्यकारणी सभेमधिल मुख्य विषय अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष मा.श्री उमेशजी करोडपती यांनी पदभार सोडत अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व वर्षी येथील माजी उपसरपंच श्री माधवराव जानकीरामशेठ बडगुजर यांची अध्यक्षपदी निवड करून त्यांना पदभार सोपविण्यात आला. सभेमध्ये सर्वांना मुद्दे मांडण्यासाठी स्वातंत्र्य देण्यात आले होते. सभेतील प्रत्येक विषयावर चर्चा करून विषयांना पुर्णत्वास नेण्यात आलेत.सदर सभेचे सुत्रसंचलन महासमितीचे सचिव मा.श्री.राजेंद्र बडगुजर यांनी केले. व सभेची सांगता ही हर्ष उल्हासात करण्यात आली.
♦♦♦♦♦♦♦♦♦

8 Comments

  1. मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व
    पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ! ??

  2. हार्दिक अभिनंदन आबासाहेब
    परमेश्वर आपणास समाज सुधारणेसाठी
    सात्विक सामर्थ्य देवो

  3. मा.माधवरावशेट यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन
    पुढील वाटचालीस लाख शुभेच्या

  4. मधवमामा आपले हार्दिक अभिनंदनव पुढील कार्यास शुभेच्छा

Leave a Reply to Yashwant K Chavan Cancel reply

Your email address will not be published.


*