आज ज्येष्ठ नागरिक दिन आहे. त्यानिमित्ताने सर्व ज्येष्ठ नागरिकांना कृतिशील व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा. ज्येष्ठ नागरिक यांनी खालील प्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे.
अमेरिकेत एका अभ्यास अहवालात असे दिसून येते की 51℅ ज्येष्ठ नागरिक हे जिने चढतांना पडून जखमी होतात,अशाप्रकारे अनेक जेष्ठ जिने चढतांना अपघात होऊन मरतात.
तज्ज्ञांच्या सूचना
वयाच्या 60 वर्षापुढे खालील 10 कृती टाळाव्यात:
1.जिने चढू नका, गरजच असेल तर आधाराच्या पाईप ला घट्ट धरून चालावे.
2.आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्म अप करा.
3.आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.
4.आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला.
5.झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.
6.आपले शरीर व्यायामपूर्वी वळवू नका आधी शरीर वॉर्म अप करून घ्या.
7.उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.
8.खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.
9.झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.
10.संडासला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या.
अजून महत्त्वाचे नेहमी कृतिशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे.
कृपया आपल्या सर्व ज्येष्ठ प्रियजनांना हा मेसेज पाठवा. (संग्रहित)
श्री. धर्मेंद्र बडगुजर, उपाध्यक्ष, अ. भा. ब. समाज कल्याण समिती.

Leave a Reply