देशी गाईंच्या संगाेपनासाठी धडपणारे ‘गाेसेवक’ इंजिनिअर शैलश बडगुजर, नीलेश पाटील

(नाेकरी सांभाळून नागरिकांमध्ये प्रबाेधन करणाऱ्या *इंजिनअरांची धुळे येथील ‘पाझरा रेडिअाे’ने घेतली खास मुलाखत*)

*पुणे (प्रतिनिधी)* भारतात देशी गाईची संख्या झपाट्याने कमी हाेत अाहे. याविषयी गाेसेवकांनी व्यापक माेहिम राबवून गाईंच्या संगाेपनासाठी जनजागृतीस सुरू केली अाहे. या महान कार्याला अापला ही हातभार लागावा व *नागरिकांना देशी गाईचे शुद्ध दूध, तूप, गाेमूत्र व इतर वस्तू उपलब्ध करुन देण्यासाठी पुण्यातील इंजिनिअर शैलश बडगुजर व नीलेश पाटील यांनी देखील जनजागृतीचा विळा उचला अाहे. नाेकरी सांभाळून नागरिकांमध्ये प्रबाेधन करणाऱ्या इंजिनअरांची दखल धुळे येथील ‘पाझरा रेडिअाे’ने घेतली अाहे.* दाेघांची खास मुलाखत घेऊन ती प्रसारीत करुन १० वर्षापासून इंजिनिअर असलेल्या दाेघा तरुणाच्या कार्याला अाकार दिला अाहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील iवर्षी येथील गरिब कुटुंबात वाढलेल्या व हलाख्याच्या परिस्थतीत उच्च शिक्षण घेऊन इंजिनिअर बनलेल्या शैलश बडगुजर व त्यांचा मित्र नीलेश पाटील यांनी पिंपळनेर येथील जेबापुरगावात गाेशाळा सुरु केली अाहे. गलेलठ्ठ पगार, सुंदर शहरात वास्तव्य असाताना देखील या दाेघा इंजिनिअर यांनी गाेशाळा कशी सुरु केली हा प्रश्न सध्या अनेकांना पडल्याशिवाय राहत नाही. हाच धागा पकडून धुळे येथील ‘पाझरा रेडिअाे’चे अहिराणी भाषेतील पहिले रेडिअाे जाॅकी जयवंत कापडे यांनी शैलेश बडगुजर व नीलेश पाटील यांची खास मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमधील प्रश्नांना बडगुजर व पाटील यांनी काळजाचा ठाव घेणारे उत्तर दिले अाहे. ते म्हणतात की, अाम्ही काळ्या अाईच्या कुशीत वाढलाे अाहे. अामच्या रक्तात ग्रामीण भागाची संस्कृती भिनलेली अाहे. अाईच्या दुधानंतर ज्या दुधाने अाम्हाला जगण्याचे व इंजिनिअर बनण्याचे ‘बळ’ दिले त्या गाेमातेचे अामच्यावर खूप माेठे उपकार अाहे; परंतु सध्या जर्शी गाईचा शिरकाव झाल्यामुळे देशी गाईची संख्या दिवसेदिवस कमी हाेत अाहे. सध्या देशी व्यतिरिक्त इतर गाईचे संगाेपन अधिक हाेत अाहे. देशी गाईच्या दूध, तूप, दही, गाेमुत्र हे हजाराे अाजारावर रामबाण उपचार करणारे अाहे. त्यामुळे देशी गायींची संख्या वाढली पाहिजे. हा विचार अाम्हाला झाेपू देत नव्हता. त्यामुळे अाम्ही दाेंघांनी निश्चय करुन देशी गाईच्या संगाेपनासाठी नागरिकांमध्ये प्रबाेधन करण्याचा विडा उचला अाहे. हे कार्य हाती घेताना सुरुवातीला अनेकांनी अामच्या पाठीवर काैतूकाची थांब मारली तर काहींनी काय हे मुर्ख इंजिनिअर असून काय गाेशाळेकडे वळले असे देखील म्हटले; पण अामचा निश्चय व विचार पक्का हाेता. त्यामुळे अाम्ही कार्य न डगमगता सुरु ठेवले असून त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत अाहे. तसेच नागरिकांना देखील अाता गाईच्या संगाेपनाचे महत्व पटू लागले अाहे. भविष्यात गावातील प्रत्येक घरासमाेर निदान दाेन ते तीन देशी गाई असतील असा अामचा विश्वास अाहे.

 

पींपळनेर गावाजवळ गाेशाळेमध्ये सध्या ६० गीर गाई अाहे. या ठिकाणी अाम्ही नाेकरी सांभाळून पुणे येथून दर शनिवार व रविवारी जाताे. त्या ठिकाणी गेल्यानंतर इंजिनअर अाहाेत हा विचार डाेक्यातून काढून गाेमातेची स्वत: सेवा करताे. तसेच नागरिकांना देशी व जरर्शी गायी मधला फरक, ए-१ व ए-२ दूध काय असते, गाेठ्याचे अाणि चाऱ्याचे नियाेजन, रासायनिक फळ भाज्या, धान्य का नकाे वापऱ्याला, अॅरगॅनिक गाेष्टीची महत्वपूर्ण माहिती, देशी गाईचे तूप अाणि गाेमूत्राचे फायदे याविषयी सविस्तर माहिती देताे. नागरिक देखील सर्व गाेष्टी एेकूण घेऊन त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली अाहे. तसेच अामच्या गाेशाळेत अाम्ही विविध उत्पादने तयार करुन ते पुण्यासह इतर ठिकाणी ना नफा, ना ताेटा तत्वावर विक्री करीत अाहाेत. यामुळे बेराेजगारांच्या हाताला देखील काम मिळाले अाहे. त्यामुळे अामचा उद्देश सफल हाेत असल्याने अामच्या मेहनतीला अाकार मिळाल्याची भावना देखील बडगुजर व पाटील यांनी मुलाखतील व्यक्त केली.

अधिक माहितीसाठी शैलेश भरत बडगुजर यांच्याशी मोबाईल क्रमांक 9890721281 साधता येईल.

Kamdhenu Range of Products

5 Comments

  1. इंजि.शैलेश बडगुजर आणि निलेश पाटील सर दोघांना शुभेच्छा! / डाॅ.बडगुजर दिलीप अमरावती

  2. इंजि.शैलेश बडगुजर आणि निलेश पाटील सर आपणास शुभेच्छा! /dr.d.d. badgujar Amravati

  3. फारच स्तुत्य उपक्रम,पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा

Leave a Reply to डाॅ.दिलीप बडगुजर Cancel reply

Your email address will not be published.


*