मनोजालय बहुद्देशीय संस्था, बहादरपुर,अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप तर्फे वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन महाअभियान अंतर्गत वृक्षारोपण २०० झाडांची लागवड – श्री. दिनेश बडगुजर, जळगाव जिल्हाअध्यक्ष – अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती

मुलाच्या स्मरणार्थ वडिलांनी लावली दोनशे रोपे

स्व. श्री. मनोज शांताराम अहिरे यांचा स्मरणार्थ ‘मनोजालय बहुउद्देशीय संस्था स्थापन करून वडील श्री शांताराम जगन्नाथ अहिरे (सुतार) यांनी बहादरपुर – मोंढाळे रस्तेचा कडेने दोन्ही बाजूला श्री क्षेत्र खंडेराय मंदिरा पर्यंत व आवारात तसेच श्री एकविरा देवी मंदिराच्या आवारात अश्या ठिकाणी दोनशे रोपांची लागवड करण्यात आली यात निंब, चिंच, आंबा, गुलमोहर, आदी प्रकारची रोपे लावण्यात आली.

स्व. श्री. मनोज शांताराम अहिरे यांचे पुणे येथे ऑक्टो. २०१६ मध्ये अपघाती निधन झाले, त्यात परिवाराला धीर देत दुःखातून सावरत मुलाचे नावे समाजा उपयोगी कार्य करावे या हेतूने वृक्षारोपण काळाची गरज ओळखत वृक्षरोपण हाती घेऊन वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबवले. पुढच्या वर्षी एक हजार वृक्ष लागवडीचा मानस हि त्यांनी बोलून दाखविले. यावेळी श्री. दिनेश बडगुजर जळगाव जिल्हाअध्यक्ष – अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती यांनी शाश्वत वृक्षारोपण हि काळाची गरज असून झाडांपासून जीवन आवश्यक ऑक्सीजन मिळतो. तसेच पाऊस येण्या करीत झाडांपासून मदत होते. झाडे जमिनीची धूप रोखण्यासाठी मदत करतात, झाडांपासून औषधी मिळतात तसेच पशु-पक्षी सुद्धा झाडांवर अवलंबून असतात व ते झाडांचा निवारा घेतात म्हणून बोलत होते.

संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय मिस्तरी यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे महती देत औद्योगिकीकरणामुळे होणारी जंगलतोड यामुळे हवामानात होणारा बदल, प्रदूषण बाबत अधिक माहिती दिली. हिरवे-हिरवे गार गालिचे ….. अशी काव्यात्मक कल्पना केवळ भूतकाळात जमा होईल अशी भीती वाटू लागल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी वृक्षारोपणासाठी श्री. अमोल चौधरी, श्री. गोरख पाटील, श्री. सोमनाथ पाटील, श्री. चेतन भदाणे, श्री. मोहन सोनावणे महाराज, श्री. राजेंद्र भिल, श्री. नरेश पाटील आदींनी मदत केली.

3 Comments

Leave a Reply to प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*