डॉक्टरांच्या मदतीने समाजाचे कल्याण करूया – श्री. मोहन हिरालाल बडगुजर, मुंबई

llश्रीगजानन प्रसन्नll

डॉक्टरांच्या मदतीने समाजाचे कल्याण करूया

    समाजातील सर्व डॉक्टर बंधू भगिनींना व अ. भा. बडगुजर समाज कल्याण समिती, अ. भा. बडगुजर युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपच्या तसेच समाजाच्या सर्व मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनम्र विनंती करीत आहोत की, आपापल्या विभागातील, शहरातील, गावातील डॉक्टर साहेबांना प्रत्यक्षरीत्या भेटून त्यांचा खाली दिल्याप्रमाणे फॉर्म भरून घ्यावा जेणेकरून आपापल्या विभागात स्थानिक बडगुजर समाजाच्या बांधवांना भगिनींना संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ घेता येईल.

कुठल्याही अडीअडचणींच्या वेळी आपले हक्काचे डॉक्टर असल्यामुळे वेळेत व पैशांमध्ये आपण सवलत घेऊ शकतो. आपल्या समाजात अनेक समाजसेवा करणारे हुशार तज्ञ असे डॉक्टर्स,
ब्लड बँक व इतर आरोग्यविषयक तज्ञ आहेत. त्याचा लाभ घेऊन समाज कल्याण व्हावे हीच प्रामाणिक इच्छा! लवकरच अ. भा. बडगुजर समाज कल्याण समिती, युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपच्या माध्यमातून डॉक्टर्स परिषद घेण्याचा मानस आहे.
ही सर्व माहिती गोळा करून वेब पोर्टल वर टाकून त्यांची डिक्शनरी बनवण्यात येईल.

www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ

     या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती आपण भरू शकतो. व अधिक माहितीसाठी आपले कार्यकर्ते-

श्री. लोकेश कोतवाल (पुणे)
7030755996
श्री. अविनाश बडगुजर
(नवी मुंबई)
9930950149
यांना संपर्क साधा.

डॉक्टर्स कडून भरून घ्यावयाचा फॉर्म
1) डॉक्टर चे नाव
2) हॉस्पिटल/ क्लिनिकचा पत्ता
3) शिक्षण/ डिग्री/ स्पेशालिस्ट
4) डॉक्टरांचा फोन नंबर

डॉक्टरांचा फॉर्म भरून घेणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव व नंबर-

तसेच सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून पण फॉर्म भरू शकता.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSctuTJUSkKbxFhOxoauo7xxH7wanptc4YK6bifiVSKsC1XwOg/viewform?usp=sf_link

टीप: सर्व डॉक्टर्स व कार्यकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. व समाज कल्याण करावे.
धन्यवाद!
श्री. मोहन हिरालाल बडगुजर
अध्यक्ष- अ. भा. बडगुजर समाज कल्याण समिती
व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*