कु. लिना लक्ष्मीकांत बडगुजर हिची आय. आय. टी. पवई मुंबई येथे पी. एच. डी. साठी निवड. दोंडाईचा येथील कृषी अधिकारी श्री लक्ष्मीकांत चुनीलाल बडगुजर (शिंदे) व सौ सिमाताई यांची कन्या कु. लिना हिला बारावी नंतर भारत सरकारची INSPIRE Scholarship रू. 80,000/- प्रतिवर्ष मिळाली. तिने Bsc ची पदवी फर्ग्युसन कॉलेज येथुन उच्च श्रेणीत पूर्ण केली. तसेच Msc (organic chemistry)ची पदवी पुणे विद्यापीठातुन उच्च श्रेणीत मिळवली. राष्ट्रीय पातळीवरील NET-SET परिक्षेत ती देशात 49वी क्रमांकाने यशस्वी झाली आहे. पीएचडी पात्रता परीक्षेत तिची IIT-पवई व IIT-गांधीनगर तसेच IISER-पुणे येथे निवड झाली व त्यापैकी तिने IIT-पवई येथे प्रवेश घेतला आहे. भारत सरकारच्या INSPIRE Fellowship अंतर्गत प्रतिमाह रु.39000/- ची स्कॉलरशिप तिला 5 वर्षासाठी प्राप्त झाली आहे. तसेच केंद्र सरकारच्या रिसर्च फॅकल्टी म्हणून ही तिला पुढे संधी मिळणार आहे. कु. लिना ही दोंडाईचा येथील समाजकारणी माजी नगरसेवक श्री.चुनिलाल कारभारी व यावल येथील श्री. वसंत देवरामशेठ बडगुजर यांची नात आहे.
तिच्या यशाबद्दल शिंदे परिवार दोंडाईचा ,पढ्याळ परिवार यावल ,रघूवंशी परिवार औरंगाबाद व साखळी , जाधव परिवार भाटपूरे व श्री.विवेकशेठ व श्री.किशोरशेठ बडगुजर जळगाव , श्री. प्रशांतशेठ बडगुजर नाशिक , श्री.घनश्यामशेठ अलोणे मुंबई यांनी शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply