MIDC मध्ये सरळसेवा भरती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
मुख्यालय, उद्योग सारथी, महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबईः९३
(महाराष्ट्र शासन अंगिकृत)
सरळसेवा भरती -२०१९ (वर्ग – क आणि वर्ग ड)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),
कनिष्ठ अभियंता (विद्युत व यांत्रिकी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक,
लिपिक टंकलेखक, भूमापक, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), पंपचालक
(श्रेणी-२), विजतंत्री (श्रेणी-२), वाहनचालक (श्रेणी-२), शिपाई व मदतनीस इत्यादी १४ संवर्गातील ८६५ रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज
मागविण्यात येत आहेत.
रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक अर्हता, विहित केलेली वेतनश्रेणी, सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, नियुक्तीच्या अटी व शर्ती व ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याबाबतच्या सूचना महा परीक्षा यांचे www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या
संकेतस्थळावर दि.१७/०७/२०१९ सायंकाळी ६.०० वाजलेपासून ते दि.०७/०८/२०१९ रात्री ११.५९ वाजेपर्यंत उपलब्ध आहेत.

महाव्यवस्थापक (मनुष्यबळ विकास)
म.औ.वि.महामंडळ, मुंबई-९३.
2019.07.12 11:50

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*