आनंदी जीवन

जीवनात सदा आनंदी रहावेl
वाट्याला आलेले दुःख विसरावेll
जीवनात छोटे छोटे वाद विसरावेl
वाटटी आलेल्या वादात न रुसावेll
जीवनात सु-विचार आचरावेl
अविचारांचे थैमान न माजावेll
जीवनात उपकर्त्या कधि न विसरावेl
उपकार त्याचे सदा ध्यानीमनी ठेवावेll
जीवनात नेहमी प्रेमाने रहावेl
प्रेमानेच सा-यांचे मन जिंकावेll
जीवनात एकमेका सहाय्य करावेl
सहाय्यानेच त्याचे भले करावेll
जीवनात तिरस्कार टाळावाl
एकमेकाप्रती सौहार्दधर्म पाळावाll
जीवनात विश्वासार्हता असावीl
निरर्थक शंखेखोर वृत्ती नसावीll
जीवनात एकमेकांच्या अडचणी जाणाl
एकमेकाप्रती प्रेमादर -सद्भाव विणाll
जीवनात एकमेकांशी एकनिष्ठ रहावेl
एकमेकाप्रती मनी भेदभाव नसावेll
जीवनात एकमेकाप्रती आदर असावाl
असावाlजीवनात सदासर्वदा आनंद असावाll

Leave a Reply to प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*