
माझा जन्म दिनांक 6 सप्टेंबर 1972 ला श्री. डिगंबर दत्तू बडगुजर मूळगाव बोरणार हल्ली मुक्काम नाशिक यांच्या पदरी झाला. माझे लग्न 30 एप्रिल 1989 ला श्री. सुरेश रघुनाथ बडगुजर यांच्या सोबत झाले. ते वैधानिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक येथे कार्यरत आहेत.
स्वतः ला वयाच्या आठव्या नवव्या वर्षांपासून चित्र काढायची आवड होती. नंतर रांगोळी पण काढायच. २०००साली नाशिक महानगर पालिकेतर्फे पुष्प प्रदर्शनात माझ्या रांगोळीला प्रथम क्रमांक चे पारितोषिक सुद्धा मिळाले आहे. 2004 नंतर मी paper quilling आर्ट कडे वळले.
लग्ना आधी तशी पेंटिंग ची आवड होतीच. रंगामध्ये रमण मला पहिल्या पासूनच आवडत. लग्ना नंतर हे सर्व कमी झालं. नंतर मूल थोडी मोठी झाल्यावर मग परत चित्र काढणे चालू केले. पहिले माझी मुलगी ७ वीत असतांना ती हे paper quilling आर्ट शिकली होती. मी सुरवातीला एक छंद म्हणून हे आर्ट करत होती. साधारणतः १५ वर्ष झाली मी हे आर्ट स्वतः करते पण आहे आणि आता इतरांना शिकवते पण आहे. आता पर्यंत मी खूप शाळा कॉलेज मधून ह्या आर्ट चे प्रशिक्षण दिले आहे. माझा स्वतः चा क्लास आहे. “savi art & craft” क्लासेस मी घरीच घेते.
मी आधार आश्रमात ही workshop घेतले आहे. आणि ह्या आर्ट च्या माध्यमातून मी आतापर्यंत 30 ते 40 महिला मुलींना आर्थिक रोजगार प्राप्त करून दिला आहे. Paper quilling आर्ट मध्ये मी स्वतः चे इंनोवशन तयार केले आहे “warli with quilling” यासाठी कोल्हापूर handicraft विभागाने मला national award साठी silection केले आहे.
Paper quilling आर्ट मध्ये वेगवेगळ्या रंगसंगती त रमून नवनवीन वस्तू बनवायलाही खूपच आवडतात. ह्या आर्ट मध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे फिनिशिंग व रंगसंगती.

Leave a Reply