दुःखद निधन

जामनेर तालुक्यातील दोदवाडे गावातील तरुणाचा आज दुपारी पोहताना बुडून मृत्यू झाल्याची
घटना घडली.

दोदवाडा येथील अतुल श्रावण बडगुजर
(वय-20) आणि त्याचा मित्र शिवाजी कैलास कोळी हे दोघे गावालगत असलेल्या शेतात शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले असता त्यात अतुल श्रावण बडगुजर हा युवक पोहून वर चढत
असताना त्याला चढता आले नाही, तो पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात
अकस्मात मृत्यूची नोंद केली. अतुल बडगुजर याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असे असून त्याला आज संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*