
यावल येथील रुद्रा बॉक्सिंग क्लब च्या माध्यमातून रविवार दिनांक 16 जून रोजी भुसावळ येथे झालेल्या सहाव्या ज्युनियर महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2019 च्या प्रशिक्षण झाले असून दुर्गेश बडगुजर याने या भुसावळ मध्ये झालेल्या स्पर्धेत यावल तालुक्यातून यश संपादन केले आहे.
भुसावळ येथे पार पडलेल्या स्पर्धेत दुर्गेश बडगुजर याने केलेल्या कामगिरीच्या बळावर त्याची अकोला येथे 21 जून 2019 रोजी होणाऱ्या राज्यपातळीवरील बॉक्सिंग स्पर्धेसाठी यावल तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दुर्गेश बडगुजर याने मिळवलेल्या यशाबद्दल यावल येथील रुद्रा बॉक्सिंग क्लब चे प्रशिक्षक पंकज दळवी, हर्षल ठाकरे, गौरव मराठी व तसेच भुसावळच्या कॅसिअस बॉक्सिंग क्लब चे अध्यक्ष सुनील नावगिरे व मध्य रेल्वेचे एनएस प्रशिक्षक चंनीलाल गुप्ता यांचे त्यास मार्गदर्शन लाभले असून, याच प्रशिक्षक मंडळींच्या मार्गदर्शनाखाली यावल येथे रूद्रा बॉक्सिंग क्लब ची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रशिक्षक पंकज तडवी यांनी दिली.
सदर मिळालेल्या यशाबद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड आपले हार्दिक अभिनंदन करीत आहे.

Leave a Reply