योगासने आणि योगासनाचे प्रकार – श्री. लोकेश कोतवाल


शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन.स्थिर व सुखकारक स्थिती म्हणजे ‘योगासन अशी व्याख्या आहे.
आपल्याला माहीत असणारी अनेक योगासने ‘अवघड वाटतात. सुरुवातीस योगासने करणे जड जाते. हळूहळूसरावाने आणि शरीर लवचीक झाल्याने ही अवघड दिसणारी आसने ‘स्थिर’ व ‘तणावमुक्त (सुखाची) होऊ लागतात. असे आदर्श आसन करणे एकदम साधत नाही. काही जणांनाकाही आसने साधतात, तर इतरांना इतर आसने साधतात. वय व शरीरबांधणीनुसार यात फरक पडतो. लहानपणी शिकल्यास योगासने लवकर येतात. म्हणूनच शाळेपासून योगविद्या शिकवणे आवश्यक आहे. 
योगासनांचे 6 गट पाडता येतील  अ) उभी आसने ब) बैठी आसने क) पाठीवर झोपून करायची आसने ड) पोटावर झोपून करायची आसने इ)खाली डोके वर पाय अशी अवस्था फ) पोटाची आसने/क्रिया या 5 गटांत मिळून शेकडो आसने येतात. मात्रत्यातली निवडक आसने प्रचलित आहेत. सर्व आसने करणे एखाद्यालाच शक्य होते. ही सर्व आसने शरीर सर्वांगाने लवचीक व सुदृढ व्हावे म्हणून उपयोगी आहेत. प्राचीन काळात अनेक योगी (हठयोगी) पुरुषांनी अनेकविध आसने शोधली. नाशिकच्या कुंभमेळ्यातले फोटो किंवा टी.व्ही दृश्ये आपण पाहिली असतील. देशातले शेकडो-हजारो साधू-बैरागी कुंभमेळ्यास जमतात. तासन् तास योगासने करण्याची त्यांची शक्ती व साधना अचंबित करते. एका पायावर उभे राहणे (एकपादासन), शीर्षासन, (खाली डोके वर पाय), पद्मासन(बैठक) आदि आसने लीलया ते तासन्तास ठेवू शकतात. असा हठयोग सामान्य माणसाला साधणे अवघड आहे. सामान्य व्यक्तीकडून तशी अपेक्षाही नसते. आरोग्यासाठी योग एवढेच आपले इथे उद्दिष्ट आहे. वरील पाच गटांतील विविध आसने आपल्याला योगशिक्षकाकडूनच शिकता येतील. आपल्याकुवतीनुसार योग्य ती आसने आणि क्रम आपण शिकूू शकतात. योगासने किंंवा योग्य मार्गदर्शनाखाली माहिती घेऊन करावे.


योगासनाचे प्रकार :
1. सिद्धासन, 2. मकरासन, 3. शीर्षासन, 4. कर्ण पिडासन, 5. योग मुद्रासन, 6. शशकासन, 7. पवन मुक्तासन, 8. मत्स्यासन, 9. मण्डुकासन, 10. धनुरासन, 11. दीर्घ नौकासन, 12. उत्तान पादासन, 13. कन्धारासन, 14. बद्ध पद्मासन, 15. गो रक्षासन, 16. सर्वांगासन, 17. त्रिकोणासन, 18. सुप्त वज्रासन.

2 Comments

  1. योगासन-योगासनचे गट-प्रकार व महत्व मुद्देसुदरित्या मांडून योग सप्ताहाचा पहिला दिवस श्री लोकेश कोतवाल या हरहुन्नरी तरूण गाजविणेचा पहिला मान यशस्वीरित्या उचलल्याचे नमूद करावेसे वाटते. गुड जाॕब लोकेश…. Please keep it up…All the Best.

Leave a Reply to प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*