(सदर बातमी ‘बातमी लेखन कार्यशाळेमध्ये’ ऍड. सौ. वैशाली भूषण बडगुजर, पुणे; सौ. रेवती सुधाकर बडगुजर, शिरपूर व श्री. दिलीप रामकृष्ण बडगुजर, नाशिक यांनी तयार केली. )
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्यासंयुक्त विद्यमाने आणि चामुंडा माता युवक मित्र मंडळ, नाशिक यांच्या अनमोल सहकार्याने आयोजित *”वेब प्रतिनिधी कार्यशाळा”* क्रॉम्प्टन हॉल, सावता नगर, नाशिक येथे रविवारी दिनांक 26, मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान वेब प्रतिनिधी कार्यशाळा संपन्न झाली.
सदर कार्यक्रम हा मुख्य उद्देश बडगुजर समाज हा डिजिटल युगाची जोडला जावा तसेच समाजातील नवीन पत्रकार, लेखक तसेच कवी जन्मास यावे हा होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुधाकर भिका बडगुजर, (मा. विरोधी पक्ष नेते , नासिक महानगर पालिका) उपस्थित होते.तसेच भगवान लक्ष्मण बडगुजर, मोहन हिरालाल बडगुजर, राजेंद्र भालचंद्र बडगुजर, पी. डी. बडगुजर सर, ईश्वर बडगुजर सर, एस. एम. बडगुजर सर, सुरेश महाले, लता प्रदीप बडगुजर, नाशिक चे उद्योजक राजेंद्र बापू बडगुजर, देवराम भटू बडगुजर त्यांनी समाजातील युवा समाजाला डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून कसे पुढे जात येईल याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेस सहभागी झालेले वेब प्रतिनिधी
पुढारी या अग्रेसर वृत्तपत्राचे संपादक श्री. मदन बडगुजर यांनी बातमीचा उगम कसा होतो , परिपूर्ण बातमी कशी बनवावी, आपल्या लेखक कवी ला कसे जागृत करावे प्रवास लेखक पासून ते वाचून बनवण्यापर्यंत कसा करता येईल व या मीडियाद्वारे मीडिया द्वारे कशा पद्धतीने पैसा कमवता येईल या बाबतीत मार्गदर्शन केले. रिलायन्स उद्योग समूहामध्ये उच्चपदस्थ श्री. दिनेश बडगुजर यांनी समाजासाठी वेब पोर्टल ची गरज का आहे व आपल्या सर्वांच्या सहभागाने हे छोटेसे रोप अशा पद्धतीने विस्तृत करता येईल या बाबतीत मार्गदर्शन केले. अभियंता व अभिनेता अविनाश बडगुजर यांनी वेबसाइटबाबतीतील तांत्रिक बाजू समजून सांगितल्या. अतिशय सहजतेने मोबाईल चा वापर करून आपण कशा पद्धतीने बातमी/लेख वेबसाईटमध्ये अपलोड करू शकतो याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. मनीष बडगुजर, पुणे (आयटी इंजिनियर) यांनी विवाह विषयक वेबसाईटची गरज का आहे. त्यामध्ये रजिस्टर कसे करता येते व कोणकोणते फिचर उपलब्ध आहेत याबाबत माहिती दिली. श्री.गोपी गिलबिले (व्यक्तिमत्व विकास वक्ते) , नाशिक यांनी समाज संघटन या विषयावर भाष्य केले. लक्ष 2019 च्या माध्यमातून समाजातील लोकांनी एकत्र येऊन सुधाकर भाऊंना पाठिंबा द्यावा असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध शहरातून बहुसंख्य प्रतिनिधींनी या कार्यक्रमासाठी सहभाग नोंदविला.

अभिनंदन.. अभिनंदन..व हार्दिक शुभेच्छा..!
बडगुजर समाजा करिता राबविण्यात आलेला उपक्रम “वेब प्रतिनिधी कार्यशाळा ” हा खरोखर कौतुकास पद आहे. या कार्यशाळेकरीता ज्या ही समाज बांधव व भगिनींनी सहकार्य व उपस्थिती लावली त्याचे मनापासुन फार फार हार्दिक अभिनंदन.
या कार्यशाळेला समाजातील काही जेष्ठ समाज बांधव व युवकांचा प्रतिसाथ मिळतोच आहे यात कणभर ही शंका नाही. तरी सर्व समाज बांधवांनी आपल्या तर्फे होईल ते सहकार्य करून या वेब कार्यशाळेच्या सदस्यांना सहकार्य करावे व आपला समाज कोठे ही मागे पडला नाही पाहिजे ही भावना मनात रूजवावी.
समाजात सर्व प्रकाराची लोक असतात. तरी जे कुणी समाज-बांधव समाजासाठी चांगले वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. त्यांना ज्या ठिकाणी ती कमी पडत असतील तेथे योग्य तो सल्ला व मार्गदर्शन समाजातील जेष्ठ व नवयुवक-युवतींनी करावा. कुठल्या ही कार्यात आपणास कमी काढणे सोपे असते पण ती कमी कशा पध्दतीणे भरता येईल याचे काम आपण सर्व समाज बांधव व खासकरू जेष्ट समाज बांधव करू शकतो.
माझ्या लिखाणात ही काही चुका असतील यासाठी क्षमस्व..
आपला एक समाज बांधव..
प्रयत्नार्थी परमेश्वर..!
एक पाऊल पुढे…
एक समाज एक व्यासपीठ..
झाडे लावा,झाडे जगवा..
पाणी आडवा,पाणी जिरवा..