अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत ओबीसी समितीची माहिती आणि आता पर्यतचा प्रवास

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत ओबीसी समिती अ. भा. बडगुजर समाज म. समितीची ओबीसी समिती प्रमुख माजी प्राचार्य.श्री.पी.आर.बडगुजर(सर) व उप प्रमुख श्री.एस्.एम्. बडगुजर यांचे कडे सोपविण्यात आली. त्या नंतर आंम्ही २६ सदस्यांची समिती बनवून ओबीसी ची पहीली सभा दि.१६/०२/२०१७ रोजी निर्मल रेसिडेन्सी हाॅल,भडगांव रोड, पाचोरा येथे घेण्यात आली. श्री. पी.आर.बडगुजर सरांनी आपल्या भाषणात ओबीसी समितीने केलेल्या कामकाज संबंधित सभेला उपस्थित असलेल्या सर्व बडगुजर समाज बांधवांना माहिती अवगत करुन दिली व ओबीसी समितीचे पुढील व्हिजन काय असेल या संदर्भात माहिती करुन दिली, भारत सरकारच्या सामाजिक न्यायिक खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या भेटी करीता त्यांच्या पीए शी पत्र व्यव्हार व वारंवार संपर्क करुन डेपोटीशन (भेटी) ची तारीख मिळवून दि.१६/०२/२०१८रोजी आठ सदस्य शिष्टमंडळ दिल्ली येथील केंद्रीय सामाजिक न्यायिक मंत्री मा.श्री.थावरचंद गेहलोत साहेबांच्या पी ए यांचेशी जवळ जवळ २० मिनिटे चर्चा करुन बडगुजर समाज केंद्रात ओबीसी मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले त्या नंतर बडगुजर समाज शिष्टमंडळ राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग आॅफिसातील कामकाज इंचार्ज साहेबांना भेटून सांगितले की आंम्ही आपल्या कडे ई.सन २०१६, १७,१८ ला बडगुजर समाजला केंद्रात ओबीसी मिळावी यासाठी अर्ज केलेले आहेत तसे त्यांनी अर्जांची तपासणी केली व ती मिळाली सुध्दा त्या फाईल्स आठ सदस्य शिष्टमंडळाने आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहून आनंद व्यक्त केला,त्याच प्रमाणे दि.१४ एप्रिल २०१८ रोजी डांगे चौक,थेरगांव, पिंप्री-चिंचवड,पुणे येथे ओबीसी जातीनिहाय जनगणना परिषदेत ओबीसी समिती प्रमुख व उप प्रमुख, बडगुजर समाजाच्या वतीने प्रतिनिधित्व करने साठी उपस्थित होतो.तसेच दि.०६आॅगष्ट २०१८ रोजी पुन्हा आठ सदस्यीय शिष्टमंडळ दिल्ली येथे गेलो होतो. त्यावेळी भारतातील ३४६ जातीतील ओबीसी वर्गाला भारतीय संविधानिक घटनात्मक व न्यायिक दर्जा देणारे १२३ वे घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले आहे,आपल्या साठी एक आनंदाची बाब आहे. या घटना दुरुस्तीत नविन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापनेची तरतूद केली आहे व लवकरच नवीन आयोगाची स्थापना होईल आणि आपले प्रश्न सुटण्यास मदत होईल. आपली ओबीसी समिती याबाबत सजगपणे संपर्क ठेवून पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
तसेच दि.२५फेब्रु २०१९ रोजी आझाद मैदान मुंबई येथे ओबीसी,भटके विमुक्त संघर्ष एल्गार मोर्चात ओबीसी समिती चे प्रतिनिधित्व करणे करीता श्री.पी.आर बडगुजर, श्री.एस्.एम्.बडगुजर,श्री.रमेश वा.बडगुजर,बडगुजर दर्शन चे संपादक श्री.प्रकाश बडगुजर आदि उपस्थित होते आंम्ही ओबीसी समितीचे पदाधिकारी सातत्याने प्रयत्नशील असून पाठपुरावा करीत आहोत.

जर कोणाला अधिक जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून माहिती घेऊ शकतात.

ओबीसी प्रमुख मा.प्रा.पी.आर.बडगुजर
मो.९९७०२०३५९५
समिती उप प्रमुख-श्री.एस्.एम्.बडगुजर, मो.९९६७९०६२६३.
धन्यवाद.

ओबीसी प्रमुख मा. प्रा. पी.आर.बडगुजर सर
समिती उप प्रमुख- श्री. एस्. एम्. बडगुजर, सर

2 Comments

  1. प्रा.पीआरबडगुजर,अध्यक्ष व श्री.एसएमबडगुजर,उपाध्यक्ष अ.भा.बडगुजर समाज महासमिती अंतर्गत ओबीसी समितीचे कार्यास त्रीवार सलाम व अभिनंदन तसेंच आपल्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश मिळो ही प्रार्थना.

  2. माननीय
    प्रा.पी आर बडगुजर सर ,श्री.एस एम बडगुजर साहेब
    आपली ओबीसी समिती सजगपणे समाजाचे न्याय्य मागणीसाठी प्रयत्नशील आहे.ही चांगली बाब आहे.
    समाजास लवकरच न्याय मिळाला पाहिजे.आपल्याला समाज कार्याबद्दल शुभेच्छा व सआदर प्रणाम!
    ‘बडगुजर समाज वेब पोर्टल’ तसेच ‘बडगुजर समाज ॲप’ समाजाच्या डिजिटल प्रगतीच्या संबंधित प्रभावी समाजसेवी उपक्रम आहेत हे नमूद करतो. / डाॅ.दिलीप बडगुजर -सौ.स्वाती बडगुजर; मुख्य संयोजिका-मातृमंडल नारी मंच अमरावती(दस्तुरनगर चौक )

Leave a Reply

Your email address will not be published.


*