जळगाव येथील बहुजन लोकमंच या सामाजिक संघटनेच्या वतीने एरंडोल येथील श्री निंबा बडगुजर यांना साहित्यातून कविता द्वारे, व्यसनमुक्ती, प्रदूषण मुक्ती, तंटामुक्ती, हागणदारीमुक्ती, रोग मुक्ती, सामुदायिक विवाह, अंधश्रद्धा, स्त्री भ्रूण हत्या, वृक्षारोपण आदी विषयांवर ती सामाजिक प्रबोधनाचे उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय राष्ट्रसंत गाडगेबाबा लोकमित्र सन्मान पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फैजपुर येथे दिनांक 26 मे रोजी होणाऱ्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार वितरण प्रसंगी प्रसिद्ध कीर्तनकार सत्यपाल महाराज, कायदेतज्ञ एड. उज्वल निकम ,कुलगुरू प्रा डॉ पी. पी. पाटील, उद्योगपती अशोक जैन, जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत श्री निंबा बडगुजर 2007 सेवानिवृत्तीनंतर अनेक संस्था संघटनांचे केंद्र यातून निगडित असून सामाजिक कार्यात सहभागी आहेत व अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.


श्री निंबा शेठ, आपणांस राज्यस्तरीय संत गाडगेबाबा लोकमित्र सन्मान पुरस्कार मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन!