चिंचोली, ता. यावल । यावल तालुक्यातील चिंचोली परीसरात चिंचोली पाणी फाउंडेशनचे वतीने परीसरातलोकसहभागातुन जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार असुनयासाठी चिंचोली च्या ग्रामस्थांसह महिलांनी जलसंधारण कामासाठीव श्रमदान करण्यासाठी गावातुन जनजागृती केली. याबाबत नुकतीचचिंचोली येथील पाणी फाउंडेशनचे वतीने चिंचोली ग्रामस्थांची बैठकआयोजित करण्यात आली होती.| यावेळी सदर निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच ;गावातील प्रतिष्ठित शेतकरी व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. आजपर्यंतचिंचोली परीसरात पावसाचे पाणी कुठेही अडविण्यात आलेले नाही.यामुळे परीसरात भुगर्भाची पाण्याची पातळी तिनशे फुटांवर गेली आहे.परीसरात भिषण पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत असुन यंदा पावसाचेपाणी अडविले नाही तर पुढे पाण्यासाठी मोठी भिषण परिस्थिती निर्माणहोणार आहे. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिसून येत असुन आख्खाजिल्हातील जनता पाण्यासाठी होरपळून निघत आहे.गेल्या २००६ पासुन यावल तालुक्यातील पाण्याची पातळी टिकुन ।होती. पंरतु गेल्या चार ते पाच वर्षे पासून तालुक्यात अल्प पाऊस होतअसल्याने १०० फुटांवर असलेली पाण्याची पातळी ४०० फुटांवरगेली आहे.पिकांना पाणी पुरत नसल्याने लाखो हेक्टर वरील केळीधोक्यात आली असुन शेतकरीवर आत्महत्या करण्याची वेळ आलीआहे. पिण्याचे पाणी दोन दिवसाआड मिळत असले तरी तालुक्यातीलबरेच ठिकाणी आठ आठ दिवस पाणी मिळत नाही.आतापासूनच एवढीभयानक परिस्थिती असुन अजुन दोन महिने पाण्यासाठी वाट बघावीलागणार आहे.परीसरात जलसंधारणाची कामे हाती घेतल्यास परीसरातीलपाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. तालुक्यातील अनेक गावांमध्येपाणी फाउंडेशनचे माध्यमातून व लोकसहभागातून जलसंधारणाचीकामे हाती घेण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून चिंचोलीयेथे ही या जलसंधारणाची कामे लोकसहभागातुन श्रमदानाने तसेचलोकवर्गणीतुन पार पडणार आहे. त्यासाठी परीसरात प्रत्येक नाल्यावरनालाबांध तयार करणे, ठिकठिकाणी लहान मोठे शेततळी तयारकरणे, याआधीचे झालेल्या कामाची दुरूस्ती करणे, नाले नागरंटीकरणे, ठिकठिकाणी नाल्यावर माती बांध करून आडवी नांगरटी करणे, पावसाचे पाणी वाया न जाता तेजमिनीत जिरविणे, विहीर पुनर्भरण करणे.शोषखड्डे तयार करणे, अशी अनेक प्रकारचेजलसंधारणाची कामे पार पाडण्यात येणारअसुन यासाठी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतूनतसेच गावकरींच्या श्रमदानाने ही कामेपार पाडण्यात येणार असून लवकरचयाबाबत ग्रामस्थांना पाणी फाउंडेशनचेवरिष्ठ अधिकारी यांच्या कडून मार्गदर्शन| ही केले जाणार आहे. यासाठी ग्रामस्थव शेकडो महिलांनी गावातून जनजागृतीकरून गावक-यांनाही लाजवेल अशीआज कामगिरी केल्याने महिलांचा सन्मानकरण्यात येत आहे. यासाठी लागणारानिधी ही लोकवर्गणीतुन जमा करण्यात येणारआहे. प्रामुख्याने म्हणजे यासाठी गावक-यांनीही प्रतिसाद दिल्याने व तरूणांनीही आपल्या गावाच्या समस्या साठीपुढाकार घेवुन यासाठी श्रमदान करण्याचेधाडस करावे अशी मागणी सुज्ञ महिलांनीकेली आहे. यावेळी चिंचोली येथील प्रा. मिलिंद बडगुजर यांनी उपस्थित हजारोग्रामस्थांना पाणी बचतीचा व आपल्याभागात राबविण्यात येणारे जलसंधारणकामासाठी समस्त गांवकरीना मार्गदर्शनकेले . ज्यांना या कामासाठी निधी देतायेत नसेल त्यांनी निदान श्रमदानाने आपलीउपस्थिती द्यावी असे आवाहन केले.| उपसरपंच निलेश सोळंके, माजी सरपंचअनिल सोंळुके, प्रगतशील शेतकरी विजयनिंबा पाटील, समाजसेवक अशोक साठे,निरज बेहेडे, उदय पाटील, नंदन साठे, सुनिलदेशमुख, भागवत साठे, दिनेश सोंळुके,प्रदिप सोंळुके, सुनिल साठे, संदिप सोनवणे,किशोर सुर्यवंशी, बबलु सोंळुके, माजी ग्रा.| प.सदस्य सुनिल सोंळुके, पोलीस पाटीलराकेश साठे, शरद साठे, गोटु सोंळुके, गणेशकोळी, समाधान पाटील, विनोद पाटील,श्रीकांत खरे, नवी दिशा स्वयं अध्ययन अभ्यासिका ग्रुप सदस्य, पाणी फाउंडेशन ग्रुपसदस्य, महिला बचत गट सदस्य व हजारोग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

प्रा.मिलींद बडगुजर यांच्या जलसंधारणेच्या कामास शुभेच्छाl
सुंदर व स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा