श्री. सुनिल रमेश बडगुजर, पोलीस हेड कॉन्स्टेबल ने.पोलीस स्टेशन जवाहरनगर, औरंगाबाद शहर यांना पोलीस महासंचालकांचे पदक

दि. २४-४-२०१९ ===========
पोलीस दलात उल्लेखनीय सेवा केल्याबददल पोलीस स्टेशन जवाहरनगर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. सुनिल रमेश बडगुजर यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले.
पोह/सुनिल बडगुजर १९९३ साली पोलीस दलात रुजु झाले. २६ वर्षाच्या कालावधीत त्यांनी पोलीस स्टेशन क्रांतीचौक व सिडको या गुन्हयांचे संख्या जास्त असलेल्या पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक यांचे रायटर म्हणुन काम केले. सन – २०१६ पासुन पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल वरिष्ठांकडुन १५० पेक्षा जास्त बक्षीसे व प्रशस्तीपत्र मिळाली. आपर्यंतच्या कालावधीत त्यांना एकही शिक्षा नाही.
पोह/सुनिल बडगुजर यांनी त्यांचे २६ वर्षाचे कालावधीत अत्यंत गंभीर, संवेदनशिल व क्लिष्ट गुन्हयांचा तपासकामास मदत केली.

पोलीस स्टेशन क्रांतीचौक – ०३ खून, ०१ फसवणुक,
पोलीस स्टेशन सिडको – ०३ खून, ०१ बलात्कार, ०२ फसवणुक
पोलीस स्टेशन जवाहरनगर ०१ ब्रुन, ०१ बलात्कार ।
वरील प्रमाणे एकुण १२ गंभीर गुन्हयांच्या तपसात मदत करुन मा.न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. वरील सर्व गुन्हयात मा.कोर्टाने आरोपीतांना जन्मठेप व कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यात अविनाश साळवे व वर्धन घोडे खून खटल्याचा समावेश आहे. MBBS ला प्रवेश मिळवुन देतो म्हणून फसवणुक करणारे आरोपीतांना जेरबंद करुन त्यांचे कडुन २४,००,०००/- (चोवीस लाख रुपये) रोख
हस्तगत करण्याची कामगिरी केली आहे. घरफोडी, चोरी, जबरी चोरी सारखे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सुनिल भाऊ हे कर्तव्यदक्ष पो. अधिकारी असून ते सामाजिक कार्यात सुध्दा अग्रेसर आहेत. युवकांना प्रोत्साहन देणे, कार्यनियोजनास मदत करणे, वेळोवेळी नवनविन संकल्पना सुचविणे इ. ते आपल्या कामगिरीप्रमाणेच सदैव तत्परतेने करीत असतात. मा. श्री. सुनिल भाऊ बडगुजर यांना आम्हा युवकांचा सलाम. आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच प्रार्थना. धन्यवाद.

श्री. सुनिल भाऊ बडगुजर

शुभेच्छूक :

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती

बडगुजर प्राऊड ग्रुप

3 Comments

  1. अभिनंदन भाऊ
    अशीच प्रगती होत रहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  2. अभिनंदन सुनिल भाऊ,

    खरोखर आपले कौतुक करावे ते कमीच आहे.
    आपण फक्त नौकरी साभांळुन नव्हे तर कर्तव्य दक्ष कार्य करत नौकरी सांभाळुन समाज कार्य करतात ते खरोखर कौतुकास्पद आहे..

    आपले कार्य असेच चालत राहो…

    आपणास माझ्या वतीने व बडगुजर समाज मंडळ,औरंगाबाद तर्फे पुन्हा एकदा अभिनंदन..!

    आई चॉमुंडा माता की जय..!

    एक समाज एक व्यासपीठ…

Leave a Reply to Dr chetan umesh Karodpati Cancel reply

Your email address will not be published.


*