ll”आद्य कर्तव्य मतदान”ll – प्रा. सी. डी. साळुंखे सर

ll”आद्य कर्तव्य मतदान”ll
सीमेवर जवान देतो बलीदानl
आपले आद्य कर्तव्य मतदानll
शेतकरी शेतात करी श्रमदानl
आपले आद्य कर्तव्य मतदानll
शेतकरी शेतात पिकवी धानl
आपले आद्य कर्तव्य मतदानll
अन्नदाता करतो अन्नदानl
आपले आद्य कर्तव्य मतदानll
डाॕक्टर करतो आरोग्यदानl
आपले आद्य कर्तव्य मतदानll
वकील करतो युक्तीदानl
आपले आद्य कर्तव्य मतदानl
शास्रज्ञ करतो विज्ञानदानl
आपले आद्य कर्तव्य मतदानll
शिक्षक करतो ज्ञानदानl
आपले आद्य कर्तव्य मतदानll
रक्तदाता करतो रक्तदानl
आपले आद्य कर्तव्य मतदानll
नेत्रदाता करतो नेत्रदानl
आपले आद्य कर्तव्य मतदानll
जितके महत्वाचे रक्तदानl
तितकेच महत्वाचे मतदानl
जितके महत्वाचे नेत्रदानl
तितकेच महत्वाचे मतदानll
जितके महत्वाचे जीवनदानl
तितकेच महत्वाचे मतदानll
जितके महत्वाचे आपले राष्ट्रगानl
तितकेच महत्वाचे मतदानll
नेता म्हणी मतदार माझी शानl
मतांसांठी नेता करी जीवाचे रानl
आपले आद्य कर्तव्य मतदानll
आपले आद्य कर्तव्य मतदानll
लोकशाहीतले सर्वांत ष्ठदानl
मतदाराने केलेले मतदानll
लोकशाहीचे आनबाननशानl
खुल्या दिलाने करा मतदानll
महान भारताचा महान मानl
आपले आद्य कर्तव्य मतदानll
———?——–
प्रा.सी.डी.साळुंखे,चोपडा-धुळे

प्रा. सी. डी. साळुंखे सर

1 Comment

  1. दुरुस्ती
    नेता म्हणे मतदार माझी शानl
    आपले आद्य कर्तव्य मतदानll
    लोकशाहीतले सर्वांत श्रेष्टदानl
    आपले आद्य कर्तव्य मतदानll

Leave a Reply

Your email address will not be published.


*