इयत्ता दुसरी MTS-2019 चा परीक्षेत शेंदुर्णी येथील श्रद्धा जनार्दन बडगुजर चा राज्यात गुणवत्ता यादीत तेरावा क्रमांक

आजचे युग हे स्पर्धेचे युग म्हटले जाते त्यामुळे आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे महत्त्वाचे असते. अनेक पालक देखील आपल्या मुलामुलींना लहानपणापासून अनेक स्पर्धापरीक्षांना सहभाग घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवत असतात

शेंदुर्णी येथील आपले समाजबांधव सौ सोनाली किरण जनार्दन बडगुजर यांची सुकन्या श्रद्धा किरण बडगुजर हिने दुसरी साठी एमटीएस परीक्षां 2019 या स्पर्धा परीक्षेत सहभाग नोंदवून जळगाव जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक राज्यात गुणवत्ता यादीत तेरावा क्रमांक पटकावून सुयश प्राप्त केले आहे त्याबद्दल तिच्यावर अनेकांनी अभिनंदन वर्षाव केला आहे.

या यशाबद्दल तिचे पालक शिक्षकांचे देखील अभिनंदन कुऱ्हे पानाचे श्री सुनिल रघुनाथ कोतवाल यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहे

श्रद्धा च्या पुढील वाटचालीसाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती बडगुजर प्राउड ग्रुप तर्फे हार्दिक शुभेच्छा.

संकलन: प्रणव रतिलाल कोतवाल(फागणे)

श्रद्धा जनार्दन बडगुजर

3 Comments

  1. अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!

    राजेन्द्र पवार, जलगांव

Leave a Reply to राजेन्द्र त्र्यंबक पवार Cancel reply

Your email address will not be published.


*