आपल्यातील सुप्त गुणांना ओळखा, त्यांना वाव द्या – चि. भावेश बडगुजर


प्रत्येक व्यक्ती मध्ये अनेक सुप्त गुण दडलेले असतात पण ते परिस्थितीअभावी किंवा काळा अभावी दडलेलेच राहून जातात. प्रत्येकाने आपल्या सुप्त गुणांना ओळखले पाहिजे आणि त्यांना चालना दिली पाहिजे. अशाच आपल्या समाजातील मांडळ येथील चि. भावेश बडगुजर ( शिक्षण अभियांत्रिकी पदविका )ने स्वतःमध्ये दडलेल्या सुप्त गुणांना ओळखले. व त्यांना चालना देण्यासाठी स्वताहुन प्रयत्न केले. चि. भावेश बडगुजर यांस स्केच बनविण्याचा छंद असून वेगवेगळ्या प्रकारचे स्केच तो बनवित असतो. त्याने आतापर्यंत बऱ्याच Celebrities आणि इतर बऱ्याचशा विषयावर स्केच बनविले आहेत.

  अशाच आपल्या समाजातील लहानांपासून थोरांपर्यंत च्या सर्व कलागुणांना, सुप्त गुणांना न्याय देण्यासाठी वेब पोर्टलची निर्मिती आहे. एक समाज एक व्यासपीठ अंतर्गत समाजासाठी, समाजातील व्यक्तींसाठी, समाजाच्याच युवकांनी तयार केलेले हक्काचे व्यासपीठ.
चि. भावेश बडगुजर, मांडळ

1 Comment

Leave a Reply to Manoj Cancel reply

Your email address will not be published.


*