पाठदुखीची समस्या; करा ‘हे’ उपाय

पाठदुखीची समस्या; करा ‘हे’ उपाय

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सर्वसामान्यपणे पाठदुखीचा त्रास सर्वांनाच होताना दिसतो. शक्यतो पाठीच्या मणक्यामध्ये त्रास किंवा ताण आल्यास पाठदुखी होण्याची शक्यता असते. विशेषतः वयाच्या पन्नाशीनंतर हा त्रास अधिक प्रमाणात आढळून येतो.

एकाच जागेवर बराच वेळ बसून राहणं, ऑफिस, लोकलचा प्रवास किंवा गाडी चालवणे यामुळे पाठिचा त्रास डोके वर काढतो. “कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे प्रौढ व्यक्तींमध्ये पाठदुखीची समस्या आढळून येते.

लुंबार स्पाँडिलायसिस, चुकीची जीवनपद्धती, मणक्यातील स्नायू कमकुवत होणे ही देखील पन्नाशीनंतर पाठदुखी होण्यास मुख्य कारणं ठरू शकतात. म्हणून पाठिचा त्रास होऊ नये म्हणून खालील खास टीप्स नक्की ट्राय करा…

1) व्यायाम आवश्यक : हल्ली शारीरिक हालचाली कमी होत असल्यामुळे स्नायू आणि हाडं कमजोर होतात. त्यामुळे पाठदुखीचा त्रास असलेल्यांनी व्यायाकडे दुर्लक्ष करु नये. त्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे.

2) वाकून नाही ताठ बसा : आपली बसण्याची सवय हे देखील पाठदुखीचं मुख्य कारण आहे. त्यामुळे बसताना आपली पाठ नेहमी सरळ असली पाहिजे. वाकून बसू नये.

3) थोडा ब्रेक हवाच : काम करत असताना काही वेळेनंतर थोडा ब्रेक घ्यायला हवा. दोन तासांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी बसत असाल तर काही वेळासाठी खुर्चीवरून उठून आजूबाजूला फेरफटका मारायला हवा.

4) गुडघ्यांची हालचाल : एकाच ठिकाणी बसल्यामुळे पायांनाही वेदना होतात. हे टाळण्यासाठी गुडघे आणि पायांची हालचाल करत राहा.

5) जास्त वजन उचलू नका : तुम्ही जी वस्तू उचलत आहात त्याचं वजन तुमच्या क्षमतेपेक्षा खूप असता कामा नये. खूप वजन उचलण्याचा प्रयत्न केल्यास पाठिवर ताण येऊ शकतो.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*