नंदुरबार येथे बडगुजर समाज महिला उन्नती मंडळाची स्थापना

दिनांक 17 मार्च 2019 रोजी नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ व महिला मंडळ यांची संयुक्त सभा लोकमान्य टिळक वाचनालय नंदुरबार येथे दुपारी 2:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री विजय संतोष बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

यावेळी महिला मंडळाची स्थापना करण्यात येऊन पद वाटप करण्यात आले पद वाटप खालीलप्रमाणे

अध्यक्ष – सौ सुनीता मनोज बडगुजर

उपाध्यक्ष – सौ पौर्णिमा अनिल बडगुजर

सचिव – सौ रेणुका शरद बडगुजर

खजिनदार – सौ प्रीती गिरीश बडगुजर

सल्लागार – सौ वैशाली कैलास बडगुजर

सौ स्वाती मिलिंद बडगुजर

सौ रेखा सदाशिव बडगुजर

सदस्य – सौ भारती संदीप बडगुजर

सौ – अनिता किरण संजय बडगुजर

सौ – संगीता आबा बडगुजर

यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री दिलीप बडगुजर यांनी आपल्या मनोगतात महिला मंडळाने बचत गट स्थापन करावे व आपला व आपल्या समाजाच्या प्रगतीकडे वाटचाल करावी असे नमूद केले.

मंडळाचे अध्यक्ष श्री विजय संतोष बडगुजर यांनी महिला मंडळासाठी नियमावली ठरवून दिली कुठलेही काम करताना किंवा कार्यक्रम घेताना महिला मंडळाने आधी समाज मंडळाचे अनुमती घेणे व होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देणे याबद्दल सांगितले जेणेकरून महिला मंडळ घेत असलेले कार्यक्रम आणखी विशिष्ट असे समाजासमोर प्रेरणादायी ठरतील असे सांगितले

यावेळी मंडळाचे सल्लागार पंडित बडगुजर यांनी महिलांनी एकसंघ राहून आपल्या समाजाची प्रगती साधावी व एकमेकांमध्ये दुराग्रह निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे नमूद केले

सदस्य सगळेच मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर उपाध्यक्ष रवींद्र बडगुजर सचिव अश्विन बडगुजर सल्लागार पंडित बडगुजर सदस्य दिलीप बडगुजर खजिनदार देविदास बडगुजर तसेच महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होते .

यावेळी नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ यांनी नवनिर्वाचित महिला मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं व मीटिंग संपल्याचे सचिव यांनी जाहीर केले

1 Comment

  1. नंदुरबार महिला मंडळ कार्यकारिणी मंडळाचे अभीनंदन व समाजोपयोगी भरीव कामगिरीसांठी शुभेच्छाll

Leave a Reply

Your email address will not be published.


*