बडगुजर समाजसेवा – समाज संघटन – समाज विकास – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

ब ड गु जर
llसमाज सेवा-समाज संघटन-समाज विकासll
प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.


साधाया समाज सेवा-संघटन- विकासाचा नेमl
व्हाट्सअप वर सरसावलेत वेगवेगळे माध्यमll

कराया अवघा बडगुजर समाज डिजिटलl
सरसावले थाटात “वेब पोर्टल”ll
मंत्र नामी “एक समाज-एक व्यासपीठ”l
समाज विकासभूमिक “ज्ञान-शक्तीपीठ”ll

आतां बडगुजर समाजात नसणार गॅपl
सरसावले जोमात “बडगुजर अॅप”ll

सदा जोमात कार्यरत स्वरस्वती मिशनl
होतकरू गरजवंतांसाठी मदतीचे स्टेशनll

समाजसेवा उद्देशाने राबवाया राष्ट्रीय योजना|
दिमाखात दाखल जहाले बडगुजर समाज जनगणना||

समाज युवायुवती सांठीची युवा पावतीl
दिमाखात कार्यरत अ.भा.युवक समितीll

समाजात जबरदस्त जोमात एक आवाज एक साऊंडl
समाजप्रेमींसांठी गृप नामी बडगुजर प्राॕऊडll

नवनवीन ग्रुप दाखल होती दिवसागणिक|
उद्देश साऱ्यांचा राजकीय मेसेज घालवी क्षणीक||

बडगुजर युवा-युवतींसाठी बडगुजर रोजगार सेवाl
इतर समाजातील युवा-युवतींना वाटे हेवाll

अपेक्षा समस्त समाजाची एकत्र या सारेl
त्यायोगे जोमात वाहतील समाज संघटनाचे वारेll

सर्वच माध्यमांनी समाजासाठी एकत्र बसावेl
समस्त समाजासाठी एकसंघ-एकीचे ध्येय ठरवावेll

समाजासाठी समाज बांधवानी मिळूनी करावे कामl
समाज सेवा संघटन विकासासाठी गाळावा घामll

मनी असावेत समाजासाठी विचार ठामl
ध्यानी घेऊ नयेत विचार कधी वामll

स्व:मोठेपणासाठी करू नका कोणाला जामl
एकसंघ-एकत्रित येऊनी करा समाजासाठी कामll

एक समाज-एक व्यासपीठ-एकछत्रl
असावा समाजासाठी समाजाचा नवा मंत्रll

समाज सेवा-संघटन- विकासासांठी सारे या एकत्रl
एक समाज – एक व्यासपीठ – एक छत्रll

?शुभम भवतू: ?

कविता – प्रा. सी. डी. साळुंखे, धुळे

प्रा. सी. डी. साळुंखे सर

7 Comments

  1. वा फारच सुंदर रचली कविता
    सुनील उल्हासनगर

    • कवितेतून बोध घेणे आवश्यक आहे.समाजासाठी एकच व्यासपीठ असणे देखील आहे.फारच सुंदर मांडणी आहे.

  2. सुंदर कविता. एक समाज, एक मंच, अनेक विचार हे समाजात एक सुत्रता व उन्नती साठी आजच्या विस्कळीत झालेल्या जगात आवश्यक व अनिवार्य आहे.

  3. छान लिखाण…
    युवा संघठन आणि समाजकार्य यांची योग्य प्रकारे मांडणी केली आहे सरांनी…

    धन्यवाद सर

  4. सर, खुप सुंदर कविता लिहिली आहे आपण ?
    आपल्या कडून अजून मार्मिक कविता ऐकण्यासाठी इच्छुक आहेत

  5. सर, खुप सुंदर कविता लिहिली आहे आपण ?
    आपल्या कडून अजून मार्मिक कविता ऐकण्यासाठी इच्छुक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.


*