आई हा शब्द तसा काही जादू करतो कि सांगता येणार नाही. पण हे जग दाखवणाऱ्या मातेचा, वात्सल्याचा अथांग महासागर असणाऱ्या एका स्त्रीचा की जी आपली माता आहे. आई या शब्दातच माया, करुणा व निस्वार्थी प्रेम असत आईचे अनेक रूपे आहे. जशी माता, जननी, मॉं धरणी, मायभुमी.
आई सुरुवातीपासूनच आई असते. असे नाही तर ती आधी मुलगी, तरुणी, विवाहिता, बहीण वहिनी अशी अनेक रुपे असते. जेव्हा आई आपल्या बाळाला नऊ महिने उदरात वाढविते. त्याची काळजी घेते. जेव्हा ते बाळ जन्माला येते तेव्हा ती आपल्या बाळाला नयनांचा दिवा तळ हाताचा पाळणा करून सर्वतोपरी सांभाळाते. त्याला बोट धरून चालायला शिकविते, वाचायला शिकविते, लिहायला शिकविते त्याचबरोबर ती नितीकथा, चातुर्यकथा सांगून कुसुम कोमल मन फुलविते. आणि त्यावर संस्कार म्हणूनच म्हणतात की…
One Mother is better than hundred Teachers.
“एक माता ही सहस्त्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे”
आपलं मूल कसे असो म्हणजे अपंग, मतिमंद तरी तिचे प्रेम हे सर्वांनी विषयी सारखेच असते. उलट तिचे ह्या अशा मुलाविषयी आगळाच जिव्हाळा असतो. जेव्हा पडल्यानंतर आपल्या तोंडून अगदी नकळत आपोआपच आई गं असा शब्द बाहेर पडतात. याला एकमेव कारण आहे की ‘आई’ ही एकच व्यक्ती आहे की ती सर्वात जवळची आहे.
आई जवळच वात्सल्याचे सर्वत्र सारखेच स्वरूप आढळते. मातेच्या प्रेमात दिक्कालाच्या अडचणीही नसतात. एखादी
श्रीमंत आई व गरीब माता यातील फरक काय ? तर श्रीमंत आई
महाग व जास्ती किंमत असलेले वस्तू देऊ करते तर गरीब आई त्याच वस्तू नाही तरी समतुल्य वस्तू मुलास देऊ करते. म्हणजे तिचे प्रेमाचे मोल कमी ठरत नाही.
अशा प्रेमाची ज्वलंत साक्ष देतोय तो रायगडावरील हिरकणीचा बुरुज. आईच्या प्रेमाची कशाशाही तुलना करता येणार नाही. कुणापुढेही न वाकलेला सिकंदर आपल्या मातेसमोर नतमस्तक होत कसे. एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज होय. आईचे कृपाछत्र हे फार विशाल आहे. तिचे उपकार ऐवढे अमाप असतात की पुर्नजन्म घेऊन देखील फिटणार नाहीत.
सौ. सुनंदा बडगुजर (शिक्षिका) पारोळा.
आई चे स्थान देवेंद्र पेक्षा उंच आहे. देव प्रत्येकाकडे लक्ष ठेवायला प्रत्यक्ष जाउ शकत नव्हता म्हणूनच त्याने आईचे निर्माण केले. गुजरातीत कविता आहे, “जनीनी जोड सखी नहीं जडे रे लोल”.
‘आई’हे जगातले सर्वात उदात्त असे दोन अक्षरी काव्य आहे.आई हे प्रेमाचे दुसरें नाव आहे.आई म्हणजे माता,ती जननी आहे.एका नव्या सृजनाला निर्माण करणारी निर्मिती आहे.
‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर.
आत्मा+ईश्वर =आई.
परंपरेने तर आईला देवाचे स्थान दिले आहे.ते आगदी यथार्थ आहे.आपल्या आयुष्यातील पहिला देव म्हणजे आई.तिच्या प्रेमाला,त्यागाला वंदन.म्हणूनच म्टटलं जातयं माता ही देवरूप आहे.
ll”मातृदेवो भवः”ll.