सर्व प्रथम सर्व महिलांना माझा नमस्कार.
नुकताच 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन होऊन गेला. त्या निमित्ताने आपले मत मांडावे असा विचार मनात आला. म्हणून मनातले काही खास विचार तुमच्यासाठी…
स्त्री या विषयावर कितीही बोलले तरी कमीच आहे. महिलांमध्ये अपार शक्ती व क्षमता आहे. व्यावहारिक जगात सगळ्याच क्षेत्रात स्त्रीने स्वतःची कीर्ती स्थापित केली आहे. आज आपल्याला असे एकही क्षेत्र दिसणार नाही ज्यामध्ये स्त्री समाविष्ट नाही आहे. आज आपल्याकडे असंख्य असे उदाहरण आहे ज्यातुन हे स्पष्ट होईल की स्त्रियांनी किती नाव कमावले आहे.
सुरुवातीच्या काळात ‘चूल व मुलं’ हे समीकरण असणारी स्त्री आज उंबरठा ओलांडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे. कल्पना चावला व सुनीता विल्यम्स या महान स्त्रियांनी अंतराळ सारख्या क्षेत्रात सुद्धा स्त्रियांचे अस्तित्व निर्माण केले आहे.
इतकेच नव्हे तर 2016 मध्ये झालेल्या सर्जीकल स्ट्राईक मधल्या एका विमानाची वैमानिक ही एक स्त्री होती. स्त्रियांसाठी ही खुप अभिमानाची बाब आहे. इतकेच नाही तर आत्ताच्या आपल्या देशाचे 2 महत्वाचे पद हे सुध्दा महिला सांभाळत आहेत. ते म्हणजे रक्षा मंत्री निर्मला सीतारमण आणि विदेश मंत्री सुषमा स्वराज. म्हणून माझी सर्व स्त्रियांना विनंती आहे की स्त्री म्हणून जन्माला आलो याचे दुःख न बाळगता गर्व करा, अभिमान बाळगा. ही आपल्याला देवाने दिलेली एक देणगी आहे. त्याला जपा.
म्हणूनच असे वाटते की, 8 मार्च या एका दिवशी महिलांचा सन्मान न करता तो दैनंदिन जीवनात रोजच झाला पाहिजे. सर्व स्त्रियांसाठी माझ्याकडून काही खास ओळी.
स्त्री………….
आई-बापाची लेक असते….
लेकराची माय असते….
नवऱ्याची सखी असते….
सासू-सासऱ्यांची सून असते….
अशी हि स्त्री सर्वांच्या सुखासाठी झगडत असते…
वेळ आलीच तर दुर्गा होणारी नाहीतर आपल्या मायेने सर्वांना आपलेसे करणारी स्त्री… एक न उलगडणारे कोडंच आहे.
कु. भाग्यश्री अरुण बडगुजर
कल्याण

“स्त्री” पृथ्वीवरील अद्भूत देन होय.
स्री-आई,बहिण,वहिणी,सखी,पत्नी असे विविध रूपे वटवितांना सर्वांगाने त्यागी वृत्त्ती ठेवते.स्री च्या मनातले ओळखणे जो जाणू शकतो तोच तीचा सन्मान करूं शकतो. “स्री-महिला तिचा धंबर पहिला”.
सुंदर लेख भाग्यश्री ताई
खुप छान लेख भाग्यश्री Mam.