श्री चामुंडा माता युवक मंडळ नवीन नाशिक विभागीय अध्यक्ष श्री. राजेंद्र पुंडलिक बडगुजर हे ग्लेनमार्क फाउंडेशन तर्फे वह्या, पुस्तके, कपडे शाळोपयोगी वस्तू वाटतांना

श्री चामुंडा माता युवक मंडळ नवीन नाशिक चे अध्यक्ष श्री राजेंद्र पुंडलिक बडगुजर हे ग्लेनमार्क फार्मासिटिकल ली. कंपनीत 29 वर्षापासून कार्यरत आहेत ते तेथिल सेफ्टी कमिटी , गणेश मंडळ तसेच कॅन्टीन कमिटी चे अध्यक्ष आहेत. दरवर्षी कंपनीचे ग्लेनमार्क फाउंडेशन तर्फे गरीब विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्यात येतो. आज रोजी विधवा महिला, आत्महत्याग्रस्त आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे आधारतीर्थ आश्रम मु. तुपादेवी, पो. अंजनेरी, त्र्यंबकेश्वर येथे वह्या, पुस्तके, शाळेच्या बॅग व इतर शाळोपयोगी वस्तू , कपडे यांचे वाटप करण्यात आले तसेच जेवणही देण्यात आले दरवर्षी अशाप्रकारे मदत करण्यात येते, आतापर्यंत दीड ते दोन लाखांची मदत करण्यात आली आहे . या अगोदरही पेठ सुरगाणा येथील पाड्यांवरील गरीब , अनाथ विद्यार्थ्यांना फाउंडेशन तर्फे मदत करण्यात आलेली आहे, पाण्याच्या टाक्या, सोलर , लाईट असेल तर तेथे लाइट अशा प्रकारे मदत करण्यात आली आहे. श्री चामुंडा माता युवक मंडळ तर्फे समाजाच्या डिरेक्टरीच्या (कुटुंबाची संपूर्ण माहिती असलेले) १००० प्रति आतापर्यंत नाशिक येथील आपल्या समाजबांधवांना घरपोच वाटप करण्यात आले आहे. श्री राजेंद्र बडगुजर हे बडगुजर समाजदूत चे वार्ताहर म्हणून नशिक येथील काम पाहतात. तसेच मंडळातर्फे दरवर्षी विविध उपक्रम समाजासाठी राबविण्यात येतात.

धन्यवाद,??

Leave a Reply

Your email address will not be published.


*